प्रेस मीडिया लाईव्ह :
पनवेल येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत इचलकरंजीचे सुपूञ व जवाहर साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य रेडेकर याने ८५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्र श्री किताबचा मानकरी ठरला.त्याची पुणे येथे होणा-या मिस्टर युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
इचलकरंजी येथील अजिंक्य रेडेकर हा सर्वसामान्य कुटुंबातील असून त्याने कठोर परिश्रमाच्या जोरावर शरीर सौष्ठव स्पर्धेत मोठी ओळख निर्माण केली आहे.त्याने अगदी इचलकरंजी शहर पातळीपासून ते तालुका , जिल्हा ,राज्य पातळीवरील अनेक शरीर सौष्ठव स्पर्धेत विविध वजनी गटांमध्ये चांगली कामगिरी करत मोठा नावलौकिक मिळविला आहे.यामध्ये त्याचा व्यायामातील नियमित सराव ,अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्पर्धेत सहभागी होत यश साध्य करण्याची धडपड खूप मोलाची ठरली आहे.
याशिवाय विविध शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये तो प्रशिक्षक म्हणून चांगली भूमिका पार पाडत आहे.शरीर सौष्ठव खेळातील त्याच्या या वेगळ्या कौशल्याबरोबरच मोठ्या योगदानामुळे त्याला राज्य शासनामार्फत श्रीशिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.याशिवाय त्याने तीन वेळा ज्युनिअर मिस्टर इंडिया , चार वेळा महाराष्ट्र श्री आणि सिनिअर मिस्टर इंडियाचा किताब मिळवला आहे.
आपल्या या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग त्याने रेडेकर जिमच्या माध्यमातूनन व्या पिढीला व्यसनापासून दूर ठेवून त्यांच्यामध्ये व्यायामाची चांगली आवड निर्माण करण्यासाठी सुरु ठेवला आहे.पनवेल येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत इचलकरंजीचे सुपूञ व जवाहर साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य रेडेकर याने ८५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्र श्री किताबचा मानकरी ठरला.त्याची पुणे येथे होणा-या मिस्टर युनिव्हर्स या जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या यशाबद्दल त्याचा कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन तथा आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी जवाहर साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य रेडेकर याने शरीर सौष्ठव स्पर्धेत चांगले यश संपादन करत मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेपर्यंत मजल गाठून इचलकरंजी शहराबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असल्याचे गौरवोद्गार काढले.तसेच त्याला भविष्यात सर्वोतोपरी सहकार्य राहिल ,अशी ग्वाही देत त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप ,किरण लंगोटे ,दत्ता शेळके , किशोर निंबाळकर , धनंजय आरेकर ,अक्षय माने आदी उपस्थित होते.