विजयी मिरवणूक काढून अनेकांनी केले अभिनंदन.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
वस्ञनगरीचा सुपूञ व जवाहर साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य रेडेकर याने पुणे बालेवाडी येथे मिस्टर युनिव्हर्स बाॅडीबिल्डिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सिनियर भारत श्री किताबचा मानकरी ठरला.या घवघवीत यशाबद्दल आज बुधवारी त्याचे वस्ञनगरीत जल्लोषी स्वागत करुन त्याची शहरातील प्रमुख मार्गावरुन विजयी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी तरुणाई मोठी संख्येने उपस्थित होती.
पुणे बालेवाडी येथे नुकताच इंडियन बाॅडीबिल्डिंग ॲन्ड फिटनेस फेडरेशन यांच्या वतीने मिस्टर युनिव्हर्स बाॅडीबिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत वस्ञनगरीचा सुपूञ व जवाहर शेतकरी साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य रेडेकर याने ८५ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सिनियर भारत श्री २०२२ चा किताबचा मानकरी ठरला.त्याच्या या घवघवीत यशाने वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.या यशाबद्दल आज बुधवारी सकाळी त्याचे वस्ञनगरीतील शिवतीर्थ येथे जल्लोषी सर्वात करण्यात आले.यावेळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे , सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे , शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार ,बंडू कोकरे ,
राजू बचाटे ,प्रकाश निकम ,विनायक आरेकर , धनराज आरेकर ,उत्तम चौगुले यांच्यासह मान्यवरांनी त्याचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवतीर्थ येथे अजिंक्य रेडेकर याने छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यानंतर अजिंक्य रेडेकर याची उघड्या जीपमधून शिवतीर्थ ,मलाबादे चौक ,गांधी पुतळा , राजवाडा चौक ,चांदणी चौक ,गुजरी पेठ चौक ,मरगुबाई मंदिर या मार्गाने विजयी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत मोटारसायकलसह तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.दरम्यान , सिनियर भारत श्री अजिंक्य रेडेकर याचे स्वागत करुन अभिनंदन करण्यासाठी विनायक बेलेकर ,प्रवीण बचाटे , आदित्य आरेकर , मनोज राजजाधव ,किशोर घोरपडे ,अमित बारटक्के ,प्रशांत बुबनाळे , सुनील रेडेकर ,असिफ मुजावर ,नागेश पाटील ,दीपक तळप , सुभाष कवटगे यांच्यासह अन्य उपस्थित होते.