उप महाराष्ट्र केसरी पै. अमृत भोसले यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे एफ.एक्स.पी.एस.वेल्थ क्रिएशन इंटरनॅशनल करंन्सी मार्केट कार्यालयाचा शुभारंभ उप महाराष्ट्र केसरी पै. अमृत भोसले यांच्या हस्ते व मास्टर प्रशांत सावंत यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
नव्या पिढीला इंटरनॅशनल करंन्सी मार्केटची माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शन देवून त्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने इचलकरंजी येथील दाते मळा परिसरात एफ.एक्स.पी.एस.वेल्थ क्रिएशन इंटरनॅशनल करंन्सी मार्केट कार्यालय सुरु करण्यात आले आहे.या माध्यमातून इच्छुकांना
इंटरनॅशनल करंन्सी मार्केटमधील अकाऊंट चालू करुन देवून मार्केटचे अपडेट देण्याची सेवा पुरवण्यात येणार आहेत.या तत्पर व चांगल्या सेवेतून इच्छुकांना आर्थिक फायदा करुन देण्याचा एफ.एक्स.पी.एस.वेल्थ क्रिएशन इंटरनॅशनल करंन्सी मार्केट कार्यालयाचा प्रयत्न राहणार आहे.या कार्यालयाचा शुभारंभ उप महाराष्ट्र केसरी पै. अमृत भोसले यांच्या हस्ते वमास्टर प्रशांत सावंत , रेश्मा नदाफ यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एफ.एक्स.पी.एस.वेल्थ क्रिएशन इंटरनॅशनल करंन्सी मार्केट कार्यालयाचे प्रमुख अरशद नदाफ , आनंद खैराटे तसेच सहकारी सुखमुनी बद्रे ,शिवम पुजारी , संतोष मोकाशी ,विजय कुरणे , कुमार पाटील , दिनेश माने , तुषार गोलंगडे , रणजीत जाधव ,दिगंबर म्हातवेकर, अशोक पाटील,अरुणा आसबे , अभिषेक सिदनाळे यांच्यासह अन्य उपस्थित होते.