इचलकरंजी येथे आरोग्य व रुग्णांचे हक्क,अधिकार प्राथमिक जाणीव, जागृती कार्यशाळा संपन्न



प्रेस मीडिया लाईव्ह :

 हातकणंगले तालुका प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे :

 कामगार कल्याण भवन,भाग्यश्री कॉलनी इचलकरंजी येथे आरोग्य  हक्क समितीच्या वतीने आरोग्य व रुग्णांचे हक्क , अधिकार  प्राथमिक जाणीव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. अभय शुक्ला . मा.शकुंतला भालेराव मा.श्री विनोद शेंडे मा. तृप्ती मालती (साथी संस्था पुणे.सर्व पदाधिकारी ) तर कार्यक्रमाचे दिशा व दर्शक म्हणून मा.श्री सुभाष नांगरे, (महात्मा फुले आरोग्य योजना कोल्हापूर जिल्हा,)" मा.श्री शाहिन शेख .)अध्यक्ष व महिती अधिकार)  ,डॉ.चेतन खाडे (जिल्हा वैद्यकीय अधिकारी) मा.श्री किरण कुंडलकर( विभागीय व्यवस्थापक. )   मा.श्री राजेश साळुंखे (सांगली जिल्हा उपाध्यक्ष)मा.श्री सुहास सावर्डे (सांगली जिल्हा कार्याध्यक्ष) इत्यादी  मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना रुग्णांचे असणारे हक्क अधिकार ,कोणत्या आजारावर सेवा, सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी नेमके काय केले पाहिजे  तसेच, खाजगी हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल, धर्मादाय हॉस्पिटल, यांची जबाबदारी आणि कर्तव्य, तसेच रुग्णांना कायदेशीर असणारे आधिकार यांची सविस्तर माहिती मान्यवरांच्या वतीने कार्यशाळेत देण्यात आली. 

तसेच मोठ्याप्रमाणात महिला व पुरुष पदाधिकारी यांनी  कार्यशाळेत  सहभागी होत  रुग्णांचे हक्क, अधिकार प्राथमिक  उपचार,सुविधा यावर चांगले प्रश्न विचारून सविस्तर चर्चा करुन महिती जाणुन घेतली.तसेच  मा.श्री शाहिन शेख यांनी आरोग्य हक्क समितीच्या कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी  मा.श्री दत्ता मांजरे, तारदाळकर,कोल्हापूर जिल्हा संघटक पदी मा.श्री नागेश क्यादगी,हातकणंगले तालुका अध्यक्ष पदी मा.श्री श्रीकांत कांबळे तर करवीर तालुका अध्यक्ष पदी  मा.श्री दत्तात्रय गोडबोले यांना नियुक्तीचे पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. 

           मा.व्रषाली साळी, मा.वंदना भंडारे, मा.श्री दिलीप  रेपे . मा.श्री तानाजी शिंदे, मा.श्री दगडू कांबळे मा.श्री लक्ष्मण पाटील मा.शबाना शहा मा.ज्योती खोबरे मा.श्री चंद्रकांत अणुक्रमांक मा.श्री संजय अग्रवाल मा.श्री प्रभाकर भोंगे मा.श्री. सरिता पांडव मा.मिनेकर मॅडम  मा.श्रीअशोक ठोमके , मा.श्री मुकुंद शेंडगे मा.श्री शिवकुमार मुरतले. मा.श्री शैलेश पाटील,मा.श्री सुरेश इंगळे.मा.श्री दस्तगीर बाणदार मा.श्री निवासी फुलपाटी मा.स्नेहा मिणेकर .इत्यादी व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post