प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
चंदूर येथे हटकर कोष्टी समाजाचे कुलगुरू, आद्य वचनकार श्री देवरदासी मैय्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक शिवाप्पा मेत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंजी समाजाचे अध्यक्ष शिवकांत मेत्री व युवक मंडळ अध्यक्ष अमित खानाज आदी उपस्थित होते.
प्रारंभी शिवकांत मेत्री यांनी आद्यवचनकार श्री देवरदासी मैय्या यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बनशंकरी ट्रस्टचे अध्यक्ष अमित कबाडे, इचलकरंजी युवक मंडळ उपाध्यक्ष हेमंत वरुटे , श्रीनिवास उरणे, नितीन वाळवेकर, कोरोचीचे दिगंबर पेठे व विजय मिरजे, चंदूर ग्रामपंचायत सदस्या सौ. योगिता सचिन हळदे व चंदूर समाज अध्यक्ष सचिन हळदे, विश्वास आमले, संजय भाकरे, रामप्रसाद करडे, सुनील वस्त्रे, रवी गड्डे, रवी सावळगी, चंद्रशेखर कोट्टलगी, विद्या म्हेत्तर, स्वाती करडे, सौ. आमले, सौ. कोट्टलगी, सौ. रेवतगाकर, पूनम दसरे, करण कोलार, सिद्धू भुस्नूर, उत्तम गड्डे, संजय गड्डे, गुरू स्वामी, गजानन धनले, अनिल वस्त्रे, गंगापुरे, प्रभाकर देगील, हणमंत कटगेरी, रुद्राप्पा बेळगी, प्रवीण रोट्टे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.