विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती : रक्तदान - आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहर परिसरातील यंञमाग उद्योगासह इतर उद्योगातील कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना या संघटनेचा शुक्रवारी १६ वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर,मोफत आरोग्य तपासणी शिबिर ,उज्वल गॅस योजना नोंदणी शिबिर , समाधान वृद्धाश्रमात धान्य वाटप , कामगार मेळावा अशा उपक्रमांसाठी मनसेचे सहकार सेना राज्य उपाध्यक्ष पुंडलिक जाधव , बालाजी उद्योग समुहाचे अध्यक्ष मदन कारंडे ,माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी ,उद्योगपती शैलेश सातपुते , संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
इचलकरंजी शहर ही कष्टक-यांची नगरी म्हणून ओळखली जाते.याठिकाणी यंञमाग उद्योग व त्याच्याशी निगडित उद्योगांमुळे अनेक रिकाम्या हातांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.असे असले तरी ब-याचदा भांडवलदार मालक वर्गाकडून कामगारांवर अन्याय करण्याचे प्रकारही घडत असतात.त्यामुळे अन्यायग्रस्त , पिडीत कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी कामगार नेते राजेंद्र निकम यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून १६ वर्षांपूर्वी महाराष्ट्र कामगार सेना या कामगार संघटनेची स्थापना करुन त्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन ,मोर्चे काढून
यंञमाग व इतर क्षेञातील कामगारांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला आहे.तसेच कामगारांना शासकीय योजनांचा देखील लाभ मिळवून देण्यात या संघटनेची आग्रही भूमिका राहिली आहे.त्यामुळे या संघटनेच्या कार्यपध्दतीबद्दल कामगारांच्या मनात मोठा विश्वास निर्माण झाला आहे.या संघटनेचा शुक्रवार १ एप्रिल रोजी १६ वा वर्धापन दिन रक्तदान शिबिर,मोफत आरोग्य तपासणी शिबिर ,उज्वल गॅस योजना नोंदणी शिबिर , समाधान वृद्धाश्रमात धान्य वाटप , कामगार मेळावा अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.तत्पूर्वी , आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे उद्घाटन मनसेचे सहकार सेना राज्य उपाध्यक्ष पुंडलिक जाधव , बालाजी उद्योग समुहाचे अध्यक्ष मदन कारंडे ,माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते ,माजी पाणी पुरवठा समिती सभापती विठ्ठल चोपडे ,माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी ,उद्योगपती शैलेश सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात
महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून कामगार वर्गाला न्याय मिळवून देतानाच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होत असलेल्या प्रामाणिक कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविकात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम यांनी संघटनेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेवून कष्टकरी कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी आम्ही कायम कटीबध्द राहू,अशी ग्वाही दिली.यावेळी संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी डाॅ. वृषभ चौगुले व त्यांच्या वैद्यकीय पथकाने कामगार वर्गाची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले. तसेच सांगलीच्या आदर्श बँकेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी माजी नगरसेवक राजू बोंद्रे ,नसेचे जिल्हा उपाध्यक्ष रवी गोंदकर , शहराध्यक्ष प्रताप पाटील , सामाजिक कार्यकर्ते नागेश शेजाळे ,प्रदीप धुञे , कामगार नेते आनंदा गुरव , सरदार मुजावर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संघटनेच्या वर्धापन दिनास शुभेच्छा दिल्या.या उपक्रमासाठी संघटनेचे संघटक राहुल दवडते , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सद्दाम मुजावर , सचिव सचिन बिरांजे , उपाध्यक्ष केंपान्ना हालगेकर , उपाध्यक्ष सुर्यकांत लोंढे , तालुकाध्यक्ष इम्तियाज शेख , शहराध्यक्ष मेहबूब गवंडी , उपाध्यक्ष बादल हेगडे , राहुल कडगावे , महेश डांगरे , मधुकर पाटील , अनिल अस्वले ,राजू पाटील ,बाबू पुजारी यांच्या सह पदाधिकारी , सदस्य उपस्थित होते.