इचलकरंजी येथे आरोग्य व रुग्णांचे हक्क,अधिकार प्राथमिक जाणीव, जागृती कार्यशाळेचे आयोजन.

 प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे .

 मंगळवार दि.19/4/2022.रोजी कामगार कल्याण भवन,भाग्यश्री कॉलनी , इचलकरंजी येथे सकाळी दहा ते  सायंकाळी चार या वेळेत  आरोग्य  हक्क समितीच्या वतीने आरोग्य व रुग्णांचे हक्क , अधिकार  प्राथमिक जाणीव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .

कोणताही आजार सांगुन येत नाही, त्यासाठी किती खर्च येईल सांगत येत नाही, परिस्थिती बिकट असेल तर, काय करायचे सूचत नाही, रुग्णाचे अधिकार महिती नाही, कोणत्या आजारावर सेवा, सुविधा, सवलती आहेत. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे माहित नाही, खाजगी हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल, धर्मादाय हॉस्पिटल, यांची जबाबदारी आणि कर्तव्य माहित नाही, आशा वेळी आपणाला रुग्णांना असणारे  कायदेशीर आधिकार काय आहेत समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण कार्यशाळा आयोजित केली आहे 

याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभय शुक्ला, मा.शकुंतला भालेराव, मा.श्री विनोद शेंडे,मा.श्री स्वप्नील व्यवहारे ,साथी संस्था पुणे* सर्व पदाधिकारी तर कार्यक्रमाचे दिशा व दर्शक म्हणून *मा.श्री सुभाष नांगरे, महात्मा फुले आरोग्य योजना कोल्हापूर जिल्हा, मा.श्री शाहिन शेख. अध्यक्ष व महिती अधिकार मा.श्री राजेश साळुंखे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री सुहास सावर्डेकर सांगली जिल्हा कार्याध्यक्ष मा.श्री.सचिन खराडे कामगार कल्याण केंद्र प्रमुख . मा.व्रषाली साळी मा.श्री शाईन चौगुले ,मा.श्री सुनील मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत. 

कार्यक्रमाचे संयोजन मा.श्री दत्ता मांजरे (तारदाळकर ) कोल्हापुर जिल्हा कार्याध्यक्ष , मा.श्री नागेश क्यादगी  कोल्हापूर जिल्हा संघटक मा.श्री जगदीश अंगठी(पदाधिकारी ).

यावेळी  मा.श्री लक्ष्मण पाटील,मा.श्री  श्रीकांत कांबळे मा.श्री दिलीप रेपे मा.वंदना भंडारे, मा.श्री अशोक ठोमके , मा.श्री मुकुंद शेंडगे मा.श्री शिवकुमार मुरतले. मा.श्री शैलेश पाटील,मा.श्री सुरेश इंगळे. मा.श्री दत्तात्रय गोडबोले इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 


सुचना ! कोरोना सद्रश्य परिस्थिती  लक्षात घेऊन कायदेशीर सर्व नियम व खबरदारी घेणे बंधनकारक.

Post a Comment

Previous Post Next Post