मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून केंद्र सरकारचा कारभाराचा निषेध.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथे इंधन दरवाढ व महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मंगेश पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी मोदी सरकार चले जाव, महागाई वाढवणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, पेट्रोल, डिझेलवरील करात ५० टक्के कपात करा, यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
देशभरात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस, खाद्यतेल, भाजीपाला अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दर वेगाने वाढत आहेत. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या तोंडी देवून जनतेची प्रचंड लूट करत आहे. मोदी सरकारच्या लुटारू नितीमुळे आणि किंमती ठरवण्याच्या चुकीच्या पद्धतीने देशात महागाईचा आगडोंब उसळला असून भाजप सरकार गरिबांच्या ताटात माती कालवत असल्याचा आरोप करत इचलकरंजी येथे इंधन दरवाढ व महागाई विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मंगेश पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पेट्रोल, डिझेलवरील केंद्र सरकारच्या करामध्ये त्वरित ५० टक्के कपात करावी, गॅसच्या किंमती त्याच्या उत्पादन खर्चानुसार आकारून त्या प्रति सिलिंडर ५०० रुपये करावी, पेट्रोल, डिझेलच्या किंमत निर्धारणाचे आयात सममूल्य धोरण रद्द करा, प्रत्यक्ष आयात व उत्पादन-वितरण खर्च या सूत्रानुसार पेट्रोल, डिझेलच्या किंमती आकारण्यात याव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या. या
निदर्शनात भरमा कांबळे, ए. बी. पाटील, सदा मलाबादे, शिवगोंडा खोत, दत्ता माने, नूरमहंमद बेळकुडे, दत्ता रावळ, सैफनबी शेख आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.