प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.११ महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात मूलभूत स्वरूपाची जी सैद्धांतिक भूमिका मांडली त्याचे समकालीन महत्व मोठे आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन आजच्या अस्वस्थ वर्तमानात सर्वांगीण समतेची प्रस्थापना होऊ शकते असे मत प्रा.रमेश लवटे यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित व्याख्यानात ' फुले - आंबेडकर व आजचा संदर्भ ' या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे विश्वस्त राजन मुठाणे होते.महात्मा जोतीबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त हे व्याख्यान आयोजित केले होते.स्वागत व प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अध्यक्षस्थानावरून बोलतांना राजन मुठाणे म्हणाले,फुले - आंबेडकर यांनी सामाजिक समतेचे महत्व जाणले होते.म्हणूनच ते जातीव्यवस्थेचे पासून समाजव्यवस्थे पर्यंतची मनुष्यनिर्मित उतरंड ही कृत्रिम आहे. सुदृढ समाजासाठी ही कृत्रिम भेदाभेद आपणच दूर केली पाहिजे.यावेळी तुकाराम अपराध,पांडुरंग पिसे,अन्वर पटेल,सचिन पाटोळे,शकील मुल्ला, नारायण लोटके,महालिंग कोळेकर, मनोहर जोशी,उज्वला जाधव ,सत्वशील हळदकर ,सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी,अश्विनी कोळी आदी उपस्थित होते.