परिवार संवाद मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,मंञी हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शन
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथे राष्ट्रवादी पक्षाच्या परिवार संवाद याञेचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले.यावेळी घोरपडे नाट्यगृहात झालेल्या परिवार संवाद मेळाव्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पक्ष अधिक बळकट करण्यासाठी जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले.तसेचपक्ष बळकट व जनतेच्या मनात मोठा विश्वास निर्माण करणारा ठरल्यास येत्या २०२४ मध्ये राष्ट्रवादीचा आमदार विधानसभेत पाठवता येईल ,असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात परिवार संवाद याञेचे आयोजन करण्यात आले आहे.या याञेतून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन करुन राष्ट्रवादी पक्ष अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे.या याञेचे इचलकरंजी येथे बुधवारी सायंकाळी आगमन झाले.यावेळी कोल्हापूर नाका येथे राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी याञेतील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कामगार मंत्री यांच्यासह याञेतील सहभागी नेते , पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले . तेथून रॅलीने शिवतीर्थ येथे येत प्रमुख मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यानंतर घोरपडे नाट्यगृहात परिवार संवाद मेळाव्याची कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष अधिक बळकट व व्यापक होण्यासाठी बुथ कमिट्या स्थापन करणे आवश्यक आहे. पहिल्या शनिवारी पक्षाला वेळ देऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधून त्यांचे मुलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केल्यास इचलकरंजीतून २०२४ मध्ये आपला माणूस आमदार म्हणून विधान सभेत पाठवता येईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी पक्षाचे कार्य उत्कृष्ट पद्धतीने सुरु आहे, मात्र , पक्ष आणखी बळकट करण्यासाठी बुथ कमिट्या सक्षम व कार्यक्षम करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांच्या योजनेप्रमाणे यंत्रमाग कामगारांनाही महामंडळाचे लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात ४ कोटी असंघटित कामगार असून त्यांचे जीवन आनंदी करण्यासाठी राष्ट्रवादीपक्षाचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी इचलकरंजी शहरात पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू ठेवून कार्यरत आहे.ज्यावेळी पक्षअडचणीत होता त्या वेळी अनेकजण बाहेर गेले. आम्ही पक्षासोबत निष्ठा ठेवून नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत राहिलो. पाणीप्रश्न, यंत्रमाग वीज बिल समस्या, पालिका गाळ्यांचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
यावेळी प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती तमाजी नगरसेवक अमरजित जाधव ,मंजुश्री जाधव , नितिन पाटील , सतीश खोचरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला.याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या मेळाव्यास युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी अध्यक्ष सुनील गव्हाणे,माजी आमदार राजीव आवळे , जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील ,माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंह पाटील , शहराध्यक्ष प्रकाश पाटील ,युवक अध्यक्ष अभिजित रवंदे ,माधुरी चव्हाण , माधुरी सातपुते , बाळासाहेब देशमुख ,अब्राहम आवळे , शुभांगी माळी , सुनीता शेळके ,रुपाली कोकणे आदींसह अन्य पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते