इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे 

इचलकरंजी नगरपरिषदेच्या  वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त शहरातील स्टेशनरोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल नजीकच्या अर्ध पुतळ्यास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमधील प्रतिमेस प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते पुप्षहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.

  याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात,पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनी, अप्पर तहसीलदार शरद पाटील,पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार, महादेव वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती,

त्याचबरोबर इचलकरंजी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, माजी सभापती राजाभाऊ कांबळे, डि.एस.डोणे,दिपक भोसले, कामगार अधिकारी विजय राजापुरे, के.के.कांबळे,स्वप्नील घाटगे,नितिन बनगे, शितल पाटील,सदाशिव शिंदे,संपत चव्हाण, विजय कोळी, राजु रजपुते,संभाजी पोवार, अविनाश मोरे, राजश्री कोरगावकर, ज्योती साठे,सुनिता कांबळे, अभिमन्यू कुरणे,भारत कोपार्डे, सचिन शेडबाळे, हर्ष माळगे,रोहन कुरणे,दिलशाद जमादार आदी मान्यवर  उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post