सरकारने दिव्यांग बांधवांची आणखी सत्वपरीक्षा न घेता न्याय द्यावा !

 दिव्यांग कल्याण संस्थेचे अनिल पाटील यांची माहिती.


प्रेस मीडिया लाईव्ह :

केंद्रा बरोबरच राज्य सरकार दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी दुर्लक्ष करत असल्याने त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे सरकारने दिव्यांग बांधवांची आणखी सत्वपरीक्षा  न घेता त्यांना न्याय द्यावा ,अशी मागणी इचलकरंजी येथेदिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेच्या बैठकीत उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी केली.तसेच याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

इचलकरंजी शहर परिसरात दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेच्या वतीने अंध , अपंग, कर्णबधिर, मतिमंद, निराधार , ज्येष्ठ नागरिक ,विधवा ,परितकत्या यांच्या मुलभूत न्याय हक्कासाठी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन,मोर्चे काढून शासनाला सातत्याने जाग आणण्याचा प्रयत्न केला जातो.याशिवाय दिव्यांग बांधवांना केंद्राबरोबरच राज्य सरकारच्या विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटीतरित्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.यामध्ये सरकारच्या शासकीय यंञणेकडून दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी चालढकलचे धोरण अवलंबले जात आहे.परिणामी ,दिव्यांगांना शासकीय योजनांच्या सुविधांचा लाभ मिळत नसल्याने त्यांचे जगणे बेभरवशाचे झाले आहे.विशेष म्हणजे सर्व दिव्यांगांना कुवतीप्रमाणे सरसकट सरकारी नोकरी मिळावी, सरसकट मासिक १५ हजार रुपये पेन्शन मिळावी, शिक्षणात १०० टक्के सवलत मिळावी,आरोग्य कार्डवर खासगी दवाखान्यात मोठ्या खर्चासाठी पाच लाख रुपये मिळावेत, शहरात शासकीय अथवा नगरपालिकेच्या जागेवर दिव्यांगांसाठी भवन बांधून द्यावे यासह विविध मागण्या प्रलंबित राहिल्याने दिव्यांगांच्या समस्यांमध्ये अधिकच भर पडली आहे.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय , इचलकरंजी नगरपरिषद ,प्रांत कार्यालय , तहसील कार्यालय व अप्पर तहसील कार्यालयावर मोर्चे , आंदोलन करुनही या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन दिव्यांगांची केविलवाणी थट्टा करण्याचा प्रकार सरकारबरोबरच लोकप्रतिनिधींनी चालवला असल्याचा आरोप दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी केला आहे.तसेच सरकारने दिव्यांग बांधवांची आणखी सत्वपरीक्षा  न घेता त्यांना न्याय द्यावा ,अशी मागणी इचलकरंजी येथे दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेच्या बैठकीत अनिल पाटील यांनी केली.तसेच सरकारने दिव्यांग बांधवांची आणखी सत्वपरीक्षा  न घेता त्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकशाहीच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.यावेळी दिव्यांग कल्याण सेवाभावी संस्थेचे प्रकाश शानवाडे, नाना दातार, सुधीर लोले, सदाशिव गडाळे, वाहिद शेख, रंजीता खटावकर, सुधीर लोले, रविराज पोवार, सुशांत पाटील ,प्रमोद मुंगळे, सुनील कटारे यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post