इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांना विनम्र अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी प्रतिनिधी :  श्रीकांत कांबळे

        इचलकरंजी ता.हातकणंगले येथे इचलकरंजी  नगरपरिषदेच्या वतीने आज सोमवार दि.११ एप्रिल  रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त वेताळ पेठ (गांधी कॅम्प) येथील  पुतळ्यास नगर अभियंता संजय बागडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.             

  याप्रसंगी इचलकरंजी नगरपरिषदचे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते,विकास बनसोडे, श्रीकांत कांबळे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, विकास विरकर, जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, उद्यान पर्यवेक्षक संपत चव्हाण,अशोक माने, रंगराव लाखे, बाबु पनोरी, रवी शिंगाडे, दिलीप मगदूम,मनोज खंदारे, सचिन शेडबाळे, जालंधर कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post