केंद्र सरकार विरोधात घोषणा बाजीने परिसर गेला दणाणून.
इचलकरंजी येथे शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात थाळीनाद करुन जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी निदर्शकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.त्यामळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
केंद्र सरकारने गॅस सिलिंडर , पेट्रोल - डिझेल अशा इंधनामध्ये भरमसाठ दरवाढ करण्याचा सपाटा लावला आहे.परिणामी ,सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे.त्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी व लाॅकडाऊन परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे.त्यात आता इंधन दरवाढीचे नवे संकट उभे ठाकल्याने सर्वसामान्य जनतेत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आता संतापाची लाट उसळली आहे.याच अनुषंगाने इचलकरंजी येथे आज रविवारी शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ परिसरात केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ विरोधात थाळीनाद करुन जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी निदर्शकांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.त्यामळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत इंधन दरवाढ कमी न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.या निदर्शनामध्ये युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत देशमुख,युवासेना जिल्हाधिकारी शिवाजी पाटील,उपजिल्हाधिकारी काशिनाथ बावडेकर, शिव माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख भारत पोवार ,माजी नगरसेवक रविंद्र माने,माजी शहरप्रमुख महेश बोहरा, धनाजी मोरे ,युवासेना तालुकाधिकारी अविनाश वासुदेव, शहराधिकारी सागर जाधव,पवन मेटे, उपशहप्रमुख संतोष गौड,भारत शिवलिंगे, कुमार धुप्पाधुळे,विनायक पोवार यांच्यासह शिवसेना ,युवासेना आजी माजी पदाधिकारी , शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.