प्रेस मीडिया लाईव्ह
इचलकरंजी / प्रतिनिधी
पारदर्शी कारभार व सभासदांचे आर्थिक हित जोपासत सहकार क्षेत्रातील अग्रगण्य इचलकरंजी शहरातील सन्मती सहकारी मल्टीस्टेट बँकेला चालू आर्थिक वर्षात सुमारे २ कोटी ४३ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळाला असल्याची माहिती बॅंकेचे चेअरमन सुनिल पाटील यांनी आज सोमवारी पञकार बैठकीत बोलताना सांगितले.तसेच अत्याधुनिक यंञमागधारकांना एकूण कर्जाच्या २० टक्के कर्ज वाढवून देवून यंञमाग उद्योगाला आर्थिक मदत करत उभारी देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सांगितले.
इचलकरजी शहरातील सन्मती सहकारी मल्टीस्टेट बँकेने पारदर्शी कारभार व सभासदांचे हित जोपासत महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन्ही राज्यांमध्ये कार्याचा विस्तार केला आहे.चालू आर्थिक वर्षात कोवीडची दुससरी लाट असतना देखील बॅंकने सुमारे ३२६ कोटी ३१ लाख रुपयांच्या ठेवी जमा करुन त्यापैकी सुमारे १९८ कोटी २१ लाख रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे.तसेच बॅंकेचे खेळते भागभांडवल सुमारे ७ कोटी ६२ लाख रुपये इतके असून राखीव निधी सुमारे २४ कोटी ४२ लाख रुपये इतका जमा झाला आहे.या स्पर्धांमधून बॅंकेला चालू आर्थिक वर्षात सुमारे २ कोटी ४३ लाख रुपये इतका ढोबळ झाला असून बॅंकेचा निव्वळ एनपीए २.६१ टक्के असल्याची माहिती बॅंकेचे चेअरमन सुनिल पाटील यांनी आज सोमवारी पञकार बैठकीत बोलताना सांगितली.
यावेळी बॅंकेचे व्हाईस चेअरमन महादेव कांबळे ,बॅंकेचे व्यवस्थापन मंडळ अध्यक्ष अजित कोईक , सीईओ अशोक पाटील यांनीही बॅंकेमार्फत सभासदांना एटीएम ,एसएमएस बॅंकींग ,एनईएफटी ,आरटीजीएस अशा विविध सुविधा देण्यात येत असून या वर्षाअखेर युपीआय ,पेटीएम ,गुगल पे , फोन पे अशा विविध सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.यावेळी संचालक मंडळाने सर्वसामान्य घटकांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याबरोबरच उद्योग - व्यवसाय वाढीसाठी बॅंकेमार्फत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी सभासद आणि बॅंकेच्या सर्व स्टाफचे मोठे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.
यावेळी बॅकेचे संचालक शितल पाटील , डॉ. पी.व्ही.कड़ोले , चंद्रकांत पाटील,डॉ. अरुण कुलकर्णी ,अण्णासो मुरचिटे ,शिवाजी माळी, प्रदिप मणेरे विठ्ठल चोपडे, डॉ.अण्णासो होसकल्ले, संजय चौगुले,प्रा.ए.जे. पाटील, श्रीमती जयश्री चौगुले, सौ. वसुधा कुडचे, तज्ञ संचालक महावीर येळरुटे , मनिष पोरवाल , व असिस्टंट सीईओ समीर मैंदर्गी ,बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते..