प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी येथे श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला.यावेळी विविध ग्रंथांचे रसग्रहण करण्यात आले.तसेच मान्यवरांकडून वाचनाचे विद्यार्थीनींना महत्व पटवून देण्यात आले.
जागतिक कीर्तीचे थोर इंग्रजी लेखक, कवी,नाटककार विल्यम शेक्सपिअर यांची जयंती व पुण्यतिथी ही 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते .त्यानिमित्ताने इचलकरंजी येथे श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये जागतिक पुस्तक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर होत्या
यावेळी विविध ग्रंथांचे रसग्रहण करण्यात आले.तसेच मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी प्रसिद्ध इंग्रजी लेखक रॉन्डा बर्न यांच्या 'द सिक्रेट या पुस्तकाने कसे बदलले माझे जीवन' या पुस्तकाचे रसग्रहण केले.यावेळी त्या म्हणाल्या,भौतिक सुविधा मिळवल्यानंतर आपण कसे जगावे"हा या पुस्तकातून संदेश दिला आहे.समाजाचे मानसशास्त्र पुस्तक वाचनातून समजते.शाळेचे ग्रंथालय समृद्ध असेल तर शाळा समृद्ध होते.शाळेचे प्रतिबिंब ग्रंथालयातून दिसून येते , असेही त्यांनी सांगितले.
क्रीडाशिक्षक प्रा.शेखर शहा यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या "प्लेयिंग ईट माय वे"या पुस्तकाचे रसग्रहण केले.प्रशालेच्या ग्रंथपाल सौ.एस. एस.नेजे यांनी मराठी लेखक अरविंद जगताप यांच्या "पत्रास कारण की"या पुस्तकाचे रसग्रहण केले.
यावेळी प्रा.ए. एम.सावंत यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास उपप्राचार्य आर.एस.पाटील,उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस. भस्मे, पर्यवेक्षक श्री.व्ही.एन.कांबळे आणि प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.