नदीवेस जनसेवा मंडळातर्फे सिनियर भारत श्री अजिंक्य रेडेकर यांचा सत्कार विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे नदीवेस जनसेवा मंडळातर्फे मिस्टर युनिव्हर्स बाॅडीबिल्डिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सिनियर भारत श्री किताबचा मानकरी ठरल्याबद्दल अजिंक्य रेडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे बालेवाडी येथे नुकताच इंडियन बाॅडीबिल्डिंग ॲन्ड फिटनेस फेडरेशन यांच्या वतीने मिस्टर युनिव्हर्स बाॅडीबिल्डिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत वस्ञनगरीचा सुपुत्र अजिंक्य रेडेकर यांनी ८५ किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सिनियर भारत श्री २०२२ चा किताब पटकावला.त्याच्या या घवघवीत यशाने वस्ञनगरीच्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.या उत्तुंग यशाबद्दल त्यांचा नदीवेस जनसेवा मंडळातर्फे

मंडळाचे उपाध्यक्ष आनंद पेटकर व अशोक बारटक्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संपत जामदार ,जयपाल हेरलगे, प्रा. बाबुराव कवटगे ,अनिल जामदार यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच सामाजिक कार्यकर्ते शांतिनाथ मगदूम ,सुभाष नाईक , बाळासाहेब मोरे ,उत्तम जामदार, बाबुराव सूर्यवंशी, कुमार हेरलगे, जयसिंग जामदार, सुनील चव्हाण ,उत्तम चौगुले , धैर्यशील निंबाळकर यांच्यासह मान्यवरांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी , सर्व कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post