तीन तास ही शस्त्रक्रिया चालली होती.
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी येथील श्री लक्ष्मी नारायण गो सेवा प्रतिष्ठानच्या वतीने एका देशी गाईच्या पोटातून तब्बल 45 किलो प्लास्टिक व इतर वस्तू शस्त्रक्रिया करून काढण्यात आल्या.तीन तास ही शस्त्रक्रिया चालली होती.
इचलकरंजी शहरातील गांधी पुतळा चौक येथील एका भटक्या गायीची प्रसृती झाली असल्याचे काही नागरिकांनी श्री लक्ष्मी नारायण गो सेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना कळविले होते.त्यानंतर सदर गायीची अवस्था पाहून चार दिवस निरीक्षण करण्यात आले व लक्षण पाहून तिची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर आज श्री लक्ष्मी नारायण गो सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख शिवप्रसाद व्यास, शासकीय डॉ. सत्यजित चिकबीरे , डॉ. राजू पुजारी, त्यांचे सहकारी प्रशांत यादव,फारूक जमादार आदींनी सदर गायीवर शस्ञक्रिया करुन तब्बल 44 किलो 800 ग्रॅम प्लास्टिक, किलतान, वायर, हेडफोन इत्यादी वस्तू पोटातून बाहेर काढल्या.
दरम्यान ,श्री लक्ष्मी नारायण गो सेवा प्रतिष्ठानतर्फे आजवर नऊ गायींच्या पोटातून प्लास्टिकसह अन्य वस्तू काढून गायींना जीवदान देण्यात आले आहे..सध्या या गो शाळेत 95 गायींचे पालन पोषण केले जात असून इचलकरंजी शहर परिसरातील देणगीदारांच्या मदतीतून हे कार्य चालू आहे ,अशी माहिती शिवप्रसाद व्यास, शरद बाहेती यांनी दिली.यावेळी सौरभ देवमोरे,धीरज पारीक, श्रीकांत दरगड,कृष्णत संपन्नावर, प्रविण सामंत, अमित कुंभार व इतर कार्यकर्ते हजर होते.
.