इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी मेहबूब बाणदार

 तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट अमित सिंग ,

 सेक्रेटरी पदी ॲडव्होकेट सदाशिव आरेकर


इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांची तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेटअमित सिंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सेक्रेटरीपदी ॲडव्होकेट सदाशिव आरेकर व जॉईंट सेक्रेटरीपदी ॲडव्होकेट समीर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सन २००५ साली इचलकरंजी येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर इचलकरंजी येथील अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशन स्थापण करण्यात आले. या असोसिएशनच्या सन २०२२ ते २०२४ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी नूतन पदाधिकारी  निवडीसाठी नुकतीच बैठक घेण्यात झाली. त्यामध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी ॲडव्होकेट मेहबूब बाणदार यांची तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट अमित सिंग यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सेक्रेटरीपदी ॲडव्होकेट सदाशिव आरेकर व जॉईंट सेक्रेटरीपदी ॲडव्होकेट समीर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर कार्यकारिणीमध्ये कार्यकारणी प्रमुख म्हणून ॲडव्होकेट शहानवाज पटेल आणि सदस्य म्हणून ॲडव्होकेट किरण हुपरे, ॲडव्होकेट राहूल सामानगडकर, ॲडव्होकेट अमर हारगे, ॲडव्होकेट सुशांत माने,ॲडव्होकेट प्रविण उपाध्ये यांचा समावेश आहे. नुतन पदाधिकाऱ्यांना सदर निवडीची पत्रे ज्येष्ठ सदस्य सिनिअर ॲडव्होकेट एम. डी. जमादार, संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विश्वास चुडमुंगे, अतिरिक्त जिल्हा बारचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष ॲडव्होकेट ए. टी. तांबे,ॲडव्होकेट डी. डी.पाटील, ॲडव्होकेट संजय गजबी, ॲडव्होकेट तोष्णीवाल, ॲडव्होकेट सुर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आली.

यावेळी नुतन अध्यक्ष नुतन अध्यक्ष ॲडव्होकेट मेहबुब बाणदार यांनी इचलकरंजी अतिरिक्त जिल्हा बार असोसिएशनच्या माध्यमातून इचलकरंजीतील न्यायसंकुलाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करून तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु. तसेच खंडपीठ प्रश्नावही सहभाग असेल. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांसह नवोदीत वकिलांसाठी वर्कशॉप घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

या वेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्षॲडव्होकेट सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विवेक तांबे, सेक्रेटरी ॲडव्होकेट विशाल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर इचलकरंजी बार असोसिएशन व अतिरिक्त जिल्हा बार...सदस्य ॲडव्होकेट, नितिन लड्डा , ॲडव्होकेट अल्ताफ मुजावर, ॲडव्होकेट शिवराज चुडमुंगे, ॲडव्होकेट इरफान जमादार, ॲडव्होकेट सदाशिव आरेकर , ॲडव्होकेट समीर पाटील , ॲडव्होकेट खानविलकर, ॲडव्होकेट अतुल रेंदाळे, ॲडव्होकेट निलेश लकडे, ॲडव्होकेट पंकज पाटील, ॲडव्होकेट डी. एम. लटके, ॲडव्होकेटएम. .यु. जमखंडी, ॲडव्होकेट जी. जे. सावंत, ॲडव्होकेट विभुते, ॲडव्होकेट कणसे,ॲडव्होकेट श्रीकांत शिंदे यांच्या सह सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post