विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस - आमदार प्रकाश आवाडे यांच्यात विविध विषयांवर चर्चा



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आमदार प्रकाश आवाडे यांची कोल्हापूर रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. यावेळी कोल्हापुरातील निवडणुकीसह वस्त्रोद्योग व अन्य विषयांवर चर्चा झाली.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात आले होते. या दरम्यान त्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची कोल्हापूर निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांचा आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी स्वागत व सत्कार केला.

यावेळी रणजितसिंह मोहिते-पाटील, अ‍ॅड. रवि शिराळकर, समित कदम, ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, अहमद मुजावर, सौ. मोश्मी आवाडे, सौ. शिल्पा दुधाणे, रुपाली पाटील, राहुल दुधाणे,  शेखर शहा, अभिषेक पाटील-किणेकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post