प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१४,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभूतपूर्व प्रकारची सामाजिक क्रांती केली.या दास्य मुक्तीच्या क्रांतीने समतावादाचा पुकारा केला. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून दिलेले योगदान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे .
भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतील तत्वज्ञानाला धरून आपण आपला वर्तन व्यवहार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. ते कर्तव्य जबाबदारीने पार पाडणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल ,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले.समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जन्मदिनी बाबासाहेबांना अभिवादन करताना ते बोलत होते. प्रारंभी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अन्वर पटेल, पांडुरंग पिसे, तूकाराम अपराध, गौतम पाटील ,हरीश कांबळे, मुसा मुजावर,भीमराव नायकवडी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.