प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या आर्थिक घडामोडींचा आढावा घेत *आमदार प्रकाशआण्णा आवाडे* यांची पत्रकार परिषद बँकेची मेन शाखा, इचलकरंजी येथे पार पडली.
बँकेचा मार्च २०२२ अखेर एकूण व्यवसाय रु. ३८०० कोटी इतका झाला. यामध्ये ठेवी रु. २३०० कोटी व रु. १५०० कोटींची कर्जाचा समावेश आहे. बँकेचे भागभांडवल रु. ६३ कोटी इतके झाले असून, आर्थिक तरतूदीपूर्वीचा नफा रु. ४० कोटी इतका झाला असल्याचे बँकेचे चेअरमन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी जाहीर केले. तसेच *बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे दादा* यांनी वेळोवेळी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळेच बँक आज चौफेर प्रगती करत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीची कायम ठेवली असून एनपीएमध्ये गतवर्षीच्या तुलनेत काहीही वाढ न होता, ढोबळ एनपीए साधारण ९% पेक्षा कमी राखला आहे. रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार कोरोना काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यवसाय उद्योजकांना त्यांची कर्ज खाती रिस्ट्रक्चर करण्याचा लाभ बँकेने दिलेला आहे. गतवर्षीच्या बिकट आर्थिक स्थितीमध्येही कर्जदार सभासदांनी थकीत कर्जाची रक्कम मोठया प्रमाणात वसुलीसाठी सहकार्य केल्यामुळे *बँकेचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत रु. ४ कोटीने वाढून रु. ४० कोटी* इतका झालेला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नवीन धोरणानुसार सहकारी बँकांनी ५०% कर्ज रु. २५ लाखाच्या आतील करून येत्या दोन वर्षात स्मॉल फायनान्स बँक म्हणून काम करणेचे आहे. हे धोरण समोर ठेवून बँकेने लहान कर्ज खाती वाढविण्यासाठी *मायक्रोफायनान्स योजनेअंतर्गत अनेकविध कर्ज योजना चालू केल्या असून लहान कर्जदार या योजनांचा लाभ घेत आहेत*, असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केले.
ठेवीदारांचा बँकेवर असलेली विश्वासार्हता, कर्जदारांनी बिकट परिस्थितीमध्येही कर्जाची वेळेत केलेली परतफेड यामुळेच बँक इच्छित प्रगती करु शकली, त्यामुळे ठेवीदार, कर्जदार, सभासद व ग्राहक यांचे बँकेचे चेअरमन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन चंद्रकांत चौगुले, संचालक अशोक सौंदत्तीकर, संचालक स्वप्निलदादा आवाडे, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, बंडोपंत लाड, महेश सातपुते, सुभाष जाधव, सी.ई.ओ विजय कामत, नूतन सी.ई.ओ. संजय शिरगावे, कर्मचारी महासंघ अध्यक्ष दिपक पाटील, राजेश पाटील, श्रीचंद टेहलानी, जनरल मॅनेजर संजय सातपुते बँकेचे इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.