मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजकांचा स्वागत
प्रेस मीडिया लाईव्ह :
देहूरोड शहराच्या मुस्लिम बांधवांनी रामनवमीच्या शोभायात्रेत पाणी वाटप करून आदर्श निर्माण केला , तर देहूरोड शहरात रामनवमीच्या शुभ मुहर्तावर भव्य शोभयात्रा काढण्यात आली.
देहूरोड शहरात राम नवमी निमित्त भव्य शोभयात्राचे आयोजन करण्यात आले होते.मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजकांचा श्रीफळ व शोल देऊन स्वागत करण्यात आले.तर मुस्लिम बांधव व तरुणांनी पुढाकार घेऊन शोभा यात्रेत पाणी वाटप करत हम सब एक हे असा आदर्श पाळला.त्यावेळी देहूरोड शहराच्या पोलिस अधिकारी मुख्य निरीक्षक वर्षा राणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थित पणे बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .
राम नवमी हा भगवान श्रीरामाचा श्री रामजन्मोत्सव साजरा करणारा हिंदू सण आहे . विष्णूचा सातवा अवतार म्हणून , हा सण हिंदू धर्माच्या परंपरेसाठी महत्त्वपूर्ण आहे . रामनवमी हा एक धार्मिक आणि पारंपारिक हिंदू उत्सव आहे . लोक हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात . रामनवमीचा सण अयोध्याचा राजा दशरथ आणि राणी कौशल्याचा मुलगा श्री भगवान राम यांच्या जयंती दिनानिमित्त साजरा केला जातो .
या दिवशी रामाच्या पराक्रमाच्या कथा पठण करून किंवा कथा वाचल्या जातात. रामायण आणि महाभारत हे भारतीय परंपरेनुसार महाकाव्य मानले जातात. काही लोक मंदिरात भेट देतात, तर काहीजण त्यांच्या घरात प्रार्थना करतात, तर काही पूजा आणि आरतीचा भाग म्हणून संगीत किंवा भजन करतात. रामनवमीच्या दिवशी लोक त्यांच्या घरी भगवान श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि आपल्या कुटुंबाची आणि जीवनाच्या सुख-शांतीची मनोकामना करतात.
प्रेस मीडिया लाईव्ह
सह संपादक अन्वरअली