प्रेस मीडिया लाईव्ह :
बेडकिहाळ कर्नाटक :
बेडकिहाळ येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ, बेडकिहाळ 2021-2022 सालामध्ये एकुण 55.36 लाखांचा नफा झाला आहे. तर सोसायटी मध्ये एकुण सभासद 2152 आहेत. एकुण शेअर भांडवल 128.39 एवढी आहे.एकुण ठेवी 1126.91, बी.डी.सी.सी. बॅंक कर्ज 876.45, मेंबर कर्ज 1352.42, निधी 254.5, गुंतवणूक 887.68, वसुली प्रमाण 98.52%, खेळते भांडवल 2423.50, अपघात विमा सभासद संख्या 1066, मरण सहाय निधी संख्या 43, एकुण व्यवहार 11099.90 एवढी आहे. अशी माहिती प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ बेडकिहाळ याचे अध्यक्ष पासगौडा बाळगौडा पाटील यांनी दिली. ते पुढे म्हणाले की देशात कोरोनाचे संकट ओढावले असताना देखील संस्था सामाजिक बांधिलकी जपत प्रामाणिकपणे कार्य करत आहे. संस्थेची संपूर्ण प्रगती ही संस्थेचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यनिर्वाहक, सर्व कर्मचारी वर्ग, संचालक, सभासद, शाखाधिकारी यांना जाते असे ते म्हणाले. स्वागत भाषण अजित धन्नापगोळ, सेक्रेटरी यांनी केले.
त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र डोमणे, संस्थेचे मुख्य कार्यनिर्वाहक अजित धन्नापगोळ, संचालक राजेंद्र हणबरट्टी, शितल बेनाडे, पांडुरंग पाटील, विशाल पाटील, दादासाब सुतार, हैबत्ती कोरे, पद्माकर पाटील, सिद्दु सुर्यवंशी, सौ.लता पाटील, सौ. प्रभावती भदरगडे, मलगौडा पाटील तसेच सर्व सभासद उपस्थित होते.
प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघ बेडकिहाळ यांचा वार्षिक अहवाल दिनांक- 26 रोजी पत्रकार परिषेद घेऊन देण्यात आला.