शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा व विविध उपक्रम राबवुन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

बेडकिहाळ कर्नाटक :

      कै. बसवंत नागु शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट बेडकिहाळ, बेळगाव जिल्हा संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली- शिवराय व भिमराय जन्मोत्सव निमित्य मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात शिवराय व भिमराय यांच्या प्रतिमेचे पूजन मा.दत्तात्रय पाटील, उधोजक कोल्हापूर, अनिकेत देशमुख, उधोजक इचलकरंजी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन  करून करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन कार्यक्रम अध्यक्षा डॉ सौ.सुमित्रा पाटील, नंदिनी गारमेटस संस्थापिका कोल्हापूर, प्रा.प्रकाश कदम-लेखक कवी प्रसिद्ध वक्ते कोगनोळी,प्रा. डॉ.अमर कांबळे नालंदा विद्यापीठ अध्यक्ष इचलकरंजी, आर जी डोमणे, पी.के.पी.एस उपाध्यक्ष बेडकीहाळ,मलगौंडा पाटील, पी के पी एस संचालक बेडकिहाळ, डॉ.सुरेश कुराडे जेष्ठ साहित्यिक गडहिंग्लज, सौ विद्या देसाई ग्राम पंचायत चेअरमन बेडकिहाळ, जे.के.पम्मार-हॉस्टेल अधिकारी चिकोडी,जयश्री जाधव ग्राम पंचायत उपाध्यक्षा बेडकिहाळ तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.


तसेच बेडकिहाळ व शमनेवाडी येथील सर्व पत्रकारांना जयंती निमित्त कपडे वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अपंग व मतिमंद मुलांना कपडे वाटप व निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले. तसेच या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मुलीला मंगळसुत्र, जोडवी,शालु मुलाला ड्रेस,उपरणी व संसारपयोगी संसार सट ट्रस्टच्या वतीने देण्यात आले. 

  प्रा. प्रकाश कदम-लेखक कवी प्रसिद्ध वक्ते आपल्या मनोगतमध्ये म्हणाले की शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉ विक्रम शिंगाडे हे गेली पंधरा ते वीस वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. शिंगाडे हे आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवत असतात. ते म्हणजे मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा, गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे, व्रुक्षारोपण करणे, साहित्य संमेलनाचे आयोजन करणे, गरजु विद्यार्थींना संगणक प्रशिक्षण मोफत देणे, अनाथ आश्रमाला भेट देऊन मुलांना कपडे, खाऊ, शालेय साहित्याचे वाटप करणे, ट्रस्टच्या वतीने वाचनालयाची स्थापना केली, समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे, असे अनेक उपक्रम ते राबवत असतात. त्यांचे  कार्य हे सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. समाजामध्ये असे विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक गावा-गावामध्ये  असा विक्रम तयार झाला पाहिजे. असे ते म्हणाले.


 प्रा. डॉ.अमर कांबळे म्हणाले की विक्रम शिंगाडे सारखा लढाऊ सामाजिक कार्यकर्ता मी कुठेच पाहिलेला नाही. यांचे कार्य म्हणजे सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे.असे ते म्हणाले. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ सुमित्रा पाटील म्हणाल्या की विक्रम शिंगाडे यांचे सामाजिक कार्य मला खूप आवडते. मोफत सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा हा त्यांचा खुप मोठा उपक्रम आहे. मी त्यांच्या  प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असते.त्यांचे सामाजिक कार्य असेच पुढे चालू राहुदे. त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

 शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रम राबवुन हा कार्यक्रम दि-16-4-2022 रोजी बी.एस.कंपोजीट कॉलेज रत्नाप्पांना  कुंभार सभागृह मध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

   त्यावेळी जीवन यादव, दत्ता मांजरेकर,शिरीष कांबळे, श्रीकांत तळवार,दिपा जाधव, महादेवी यादव, नागेश शेजाळे,अन्वर मुल्ला आदी उपस्थित होते.



  

  ‌

Post a Comment

Previous Post Next Post