स्थानिक आदिवासी ग्रामस्थांच्या पाठपुराव्याने

 वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालयाच्या कामाला सुरुवात


प्रेस मेडिया ऑनलाईन

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

नेरळ ग्रामपंचायत मधील वाल्मिकीनगर येथील तोडण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी आता नव्याने शौचालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे.सार्वजनिक शौचालय स्थानिक गैरसोय होणार हे लक्षात न घेता तोडण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी स्थानिक आदिवासी कातकरी समाजाची बाजू उचलून धरली होती.तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आदिवासी ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान,स्थानिक आदिवासी महिलांची गैरसोय लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतने तेथे १५ वित्त आयोगाच्या निधीमधून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरु केले आहे. 

  नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालय तीन फेब्रुवारी २०२२ रोजी ग्रामपंचायतीने तोडले होते.ग्रामस्थांसाठी पर्यायी व्यवस्था न करता आदिवासी लोकांसाठी आरक्षित असलेल्या वाल्मिकीनगर मधील एका बिगर आदिवासी व्यक्तीने अर्ज करून तोडण्याची मागणी केली होती.त्या वर्गावर ग्रामसभेत चर्चा झाली आणि त्यानंतर ते 

सार्वजनिक शौचालय तोडण्यात आले असा दावा नेरळ ग्रामपंचायतने केला आहे.मात्र त्या भागातील २०० हुन अधिक कुटुंब त्य्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत होते. नेरळ ग्रामपंचायतने ते सार्वजनिक शौचालय तोडताना स्थानिकांची पर्यायी व्यवस्था केली नाही.त्यामुळे स्थानिक आदिवासी कातकरी समाजाच्या लोकांना कोतवालवाडी भागातील मोकळ्या जागेत हातात पाण्याचा डब्बा घेऊन जावे लागत होते.हि बाब प्रसार माध्यमे यांनी सामान्य जनतेच्या लक्षात आणून दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी वाल्मिकीनगर येथे जाऊन स्थानिक आदिवासी लोकांना पाठिंबा दिला होता.मात्र त्यावेळी स्थानिक आदिवासी महिला यांनी नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी यांची भेट घेऊन त्याच जागेवर नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यात येईल असे आश्वासन दिले होते. 

  नेरळ ग्रामपंचायतने त्या ठिकाणी १५ वित्त आयोगाच्या निधीमधून नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरु केले आहे.स्थानिक महिलांची गैरसोय होणार यांची कल्पना असताना देखील नेरळ ग्रामपंचायतने तेथील सार्वजनिक शौचालय तोडले होते. त्यामुळे आता ग्रामपंचायत कडून नाहक खर्च करीत नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम सुरु केले आहे. तेथील सार्वजनिक शौचालय तोडल्यानंतर स्थानिकांची काय गैरसोय होत आहे,याबाबत कोणताही ग्रामपंचायत सदस्य तेथे पोहचला नव्हता आणि भूमिपूजन करायला सर्व सदस्य पोहचले हे काय आहे असा सवाल वाल्मिकीनगर मधील स्थानिक आदिवासी समाजाच्या महिलांनी केला आहे.ते सर्व सदस्य समस्या निर्माण करतात आणि नंतर स्थानिक आदिवासी लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी फोटोसेशन करायला येतात काय असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.   

   मनसेचे कर्जत तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर,उपतालुका अध्यक्ष मिलिंद मिसाळ यांनी वाल्मिकी नगर येथे जाऊन आदिवासी समाजाच्या ग्रामस्थांची भेट घेऊन तुमच्या समस्या सुटण्यासाठी आम्ही पाठीशी आहोत असे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post