सुफी संत हज़रत एैनीशाह सहाब किब्ला ( रहे . ) यांचा उरुस संपन्न.

उरुसा मध्ये महाराष्ट्र मधील मौला ,मौलवी  यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे : सुफी संत अलहाज हजरत सैय्यदी पीर ऐनी शाह सहाब किल्ला ( रहे . ) यांचा उरुस नुकताच अत्यंत थाटामाटात व उत्साहात पुणे भवानी पेठ येथील रोशन मस्जिद दुल्हा - दुल्हन कब्रिस्तान येथे साजरा करण्यात आला . उरुसाचे हे सहावे वर्ष होते .सदरचा हा कार्येक्रम अत्यंत नियोजन पद्धतीने करण्यात आला.




हजरत किबला  यांच्या उरुसासाठी , मुंबई , पुणे , सोलापूर , सांगोला व कोल्हापूर येथून त्यांचे शिष्य व खलिफा आले होते . तर  विविध ठिकाणाहन मौलाना , मौलवी देखील आले होते . सायंकाळी सहानंतर  सुफी संत अल्हाज हजरत सैय्यदी पीर ऐनी शाह सहाब किल्ला (रहे ) यांच्या मजार शरीफ वर संदल लावून चादर , गिलाफ चढवण्यात आला यानंतर हज़रत किब्ला यांचे वारसदार जानशिन मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ ( मखदुमी शाह ) यांनी फातिहा देऊन दुवाँ केली व  सलाम पढून उपस्थित सर्वांसाठी दुवाँ , प्रार्थना करण्यात आली . 


मगरीब नमाज नंतर रोशन मस्जिदचे सदर मौलाना इद्रीस सहाब हाफिज कय्युम सहाब (नायाव इमाम)और हाफिजे शैफिउल्लाह यांनी फातीहा दिल्या त्या नंतर सर्व उपस्थिताना भोजन (महाप्रसाद ) देण्यात आले.

 मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ ( मखदुमी शाह ) यांचे विशेष बयान 

...ज्ञान मिळविण्यासाठी ,  प्राप्त होण्यासाठी गुरु सोबत राहणे हे महत्वाचे ..मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ (मखदुमी शाह ) 


 रात्री नऊ नंतर हज़रत किब्ला यांचे वारसदार जानशिन मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ ( मखदुमी शाह ) यांचे विशेष बयान सुरू झाले .  या बयान मध्ये  त्यांनी  ज्ञान मिळविण्यासाठी प्राप्त होण्यासाठी गुरु सोबत राहणे हे महत्वाचे आहे  गुरू विना ज्ञान प्राप्त होऊच शकत नाही  असे सांगीतले . त्याच बरोबर गुरू कसा असावा ? गुरूंची जबाबदारी काय असते..?  ,  गुरु शिष्याचे नाते कसे असावे ?..तसेच फातिहाचे विशेष महत्व याची सविस्तर माहिती मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ मख्दुमी शाह यांनी बयान द्वारे केले . 

 बयान ऐकण्यासाठी प्रचंड मुस्लिम जनसमुदाय हजर होता . या नंतर महिफिले समाचा कार्येक्रम रात्री तीन पर्यंत सुरू होता.   सुफी संत हजरत ऐनी शाह सहाब किब्ला ( रहे . ) उरुसाचे संपूर्ण नियोजन  हज़रत किबला यांचे वारसदार व जानशिन ) मौलाना शाह नजीरुद्दीन ( उर्फ मख्दमी शाह ) यांचे मार्फतच केले जाते . विशेष करून त्यांचे प्रमुख महागुरु मौलांना गौसवी शाह सहाब ( हैद्राबाद ) यांचे पूर्व परवानगी ने व त्यांच्या आदेशानुसार करण्यात येतात . सदर उरुसाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुफी संत हजरत ऐनी शाह सहाब किल्ला ( रहे ) व मौलाना शाह नजीरुद्दीन उर्फ मुख्तमी शाह यांचे बंधु शाह मोईनुद्दीन शाह ,  हबीबउद्दीन शाह , सुलतान शेख , हजरत यांचे खलिफा व शिष्य यांनी परिश्रम घेतले या उरुसाच्या कार्यक्रमास पुणे शहरातील मेरा भारत टाइन्स चे संपादक उस्मान शेख  , अजहर  कादरी , हैदर कादरी , सलीम खान, मूलनिवासी मुस्लीम मंचचे अंजुम इनामदार ,  हाजी इक्राम ,  पत्रकार अनवर अली शेख , ( पत्रकार ) , मुद्दशीर इत्तरवाले , मतीन केटरर्स , व समाजसेवकांचा व हजरत यांचा भक्तांचा ही मोठ्या प्रमाणात समावेश होता .

Post a Comment

Previous Post Next Post