प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी/प्रतिनिधी :
होळीचा खर्च टाळत यड्राव (ता. शिरोळ) येथील समाधान सोशल फौंडेशनच्या वतीने प्रमोद रेणू बिराजदार याच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेण्यात आली आहे. समाधान सोशल फौंडेशनच्यावतीने सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जातात.
यंदाही होळीसाठी होणार्या खर्चाला फाटा देत प्रमोद बिराजदार या विद्यार्थ्याच्या वार्षिक शैक्षणिक खर्चाचे पालकत्व घेण्यात आले आहे. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत फौंडेशनच्या वतीने ही भेट देण्यात आली. यावेळी सर्वांनी मिळून त्याचा वाढदिवस उत्साहात साजरा केला. याप्रसंगी आदींसह विविध मान्यवरांनी भेट दिली आणखी काही मतिमंद व गरजू मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा फोंडेशन चा मानस आहे .
या वेळी ग्रा.प सदस्य बाबासो राजमाने,अशोक बोरवणकर, अॅड. विनोद जगदाळे, मयुर कुंभोजे,इजि राजेश देसाई,सुरेश कुलकर्णी, उत्तम चव्हाण, शशिकांत परीट, मनोहर कुंभार, सुधीर कुंभार, वृषभ कुंभोजे ,सुरज कुंभोजे, राहुल पाटील ,शीतल चौगुले,कुबेर पाटील ,सचिन पाटील, शितल उपाध्ये, दिलीप कुंभार दादासो मठपती गंगाधर निराळे , श्रीधर कुंभोजे, अविनाश कुंभार सचिन गरड प्रवीण कुंभोजे योगेश कुंभोजे चेतन पटेल आदीं उपस्थित होते