युवकांनी विद्यानंदच्या व्यसनमुक्तीच्या कार्याचा आदर्श घ्यावा : सादिक शेख

 " इंजि. विद्यानंद पाटील यांना व्यसनमुक्ती- मधुमेहमुक्तीदूत पुरस्कार   प्रदान "


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर :   युवकांच्या भारत देशातील साठ टक्के लोक व्यसनाधीन असून युवक मोठ्या संख्येने व्यसनाधीन बनताहेत , युवकांच्या व्यसनमुक्तीतून भारत महासत्ता बनेल , आजच्या युवकांनी विद्यानंदच्या व्यसनमुक्तीच्या कार्याचा आदर्श घेऊन , स्वतः व्यसनमुक्त होऊन इतरांनाही व्यसनमुक्त करावे , असे आवाहन न्यूट्रीफिल हेल्थ आणि सोशल फाउंडेशनचे चेअरमन सादिक शेख यांनी केले . ते कोल्हापुरात राज्यस्तरीय व्यसनमुक्ती  , मधुमेहमुक्तीदूत पुरस्कार वितरण आणि सभासद प्रशिक्षण सोहळ्यात बोलत होते . या कार्यक्रमात सैनिक टाकळी ( ता. शिरोळ ) येथील छत्रपती शंभूराजे आधार व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती मार्गदर्शन केंद्र आणि प्रबोधन पुस्तक एक्सप्रेसचे संचालक इंजि. विद्यानंद विकासराव पाटील यांना जि. प. चे सदस्य शिवाजीराव मोरे , सादिक शेख , शिवशंभु निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक इंजि. सागर देसाईं , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. विकास पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य शिवाजीराव मोरे ( आप्पा ) हे होते .

         यावेळी बोलताना सादिक शेख म्हणाले , इंजि.विद्यानंद पाटील हे सध्या शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये बी. टेक. ( मेकॅनिकल ) द्वितीय वर्षात शिकत असून ते दरवर्षी 12 जानेवारी जिजाऊ जयंतीदिनी सिंदखेडराजा , 6 जून शिवराज्याभिषेक  दिनी रायगड , यासह विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आणि व्यसनमुक्ती -मधुमेहमुक्ती प्रचारक म्हणून काम करतात . त्यांनी हजारो लोकांना व्यसनमुक्त केले असून सैनिक टाकळी आणि मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवन , सांगली येथील केंद्राचे संचालक म्हणून काम पाहतात . त्यांना 20व्या वर्षी व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी चार पुरस्कार मिळालेले आहेत . ते वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद , संभाजी ब्रिगेड आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषदेचे कार्यकर्ते आहेत . विद्यानंद पाटील हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सातत्याने समाजकार्यात अग्रेसर असतात . त्यांनी व्यसनमुक्ती  क्षेत्रात अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य केले असून मराठा - बहुजनांच्या अनेक चळवळीत ते सक्रिय असतात . कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आदर्श " कमवा आणि शिका " या तत्त्वानुसार ते उच्च शिक्षण घेत आहेत . या कार्याची दखल घेऊन संस्थेने त्यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती-मधुमेहमुक्तीदूत पुरस्काराने सन्मानित केले . विद्यानंदचे शैक्षणिक , सामाजिक , राजकीय तसेच सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे .

पुरस्काराला उत्तर देताना इंजि. विद्यानंद पाटील म्हणाले , व्यसन हा मानसिक व शारीरिक आजार असल्याने , महापुरुषांच्या विचाराने , समुपदेशनाने व अल-निको-नील स्प्रेच्या सहाय्याने कमी वेळेत , कमी खर्चात , कोणतेही औषध पोटात न घेता , फक्त बाहेरून स्प्रे करून , दुष्परिणामाशिवाय ,  घरच्या घरी , दवाखान्यात न जाता , सहज , साध्या , सोप्या आणि आनंदी पद्धतीने व्यसनमुक्त होता येते . यासाठी छत्रपती शंभुराजे आधार व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्र , सैनिक टाकळी तसेच 98 811 72 889 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा , असे आवाहनही  इंजि. विद्यानंद पाटील यांनी शेवटी केले .

 यावेळी शिवाजीराव मोरे आणि इंजि. सागर देसाई , डॉ.विकास पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली . 

        यावेळी डॉ. गुरव , डॉ. सोनाली कुरणे , उषा दिक्षित , प्रमोद शिराळे , मीनाक्षी शहाजी भोसले , हिना शिकलगार  , देवदास जाधव यांच्यासह केंद्र चालक , विस्ताराधिकारी , सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वागत सुहास पाटील यांनी , प्रास्ताविक अस्लम शेख यांनी तर आभार संदीप कुंभार यांनी मानले .

Post a Comment

Previous Post Next Post