प्रेस मीडिया लाईव्ह :
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. क्विह शहरावर युक्रेनने मोठ्या प्रमाणात हल्ला केला असून तिथे मोठ्या प्रमाणात रशियाने विध्वंस केला आहे.
आणखीन एका भारतीय तरुणाचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू ......
युक्रेनच्या खारकीव शहरात एका भारतीय तरुणाचा रशियाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्या तरुणाचा मृतदेह अद्याप भारतात आलेला नसताना आता आणखी एका भारतीय तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे.त्या तरुणाचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाल्याचे समजते.
चंदन जिंदाल (22) असे त्या तरुणाचे नाव असून तो मूळचा पंजाबमधील बर्नाला जिल्ह्यातील होता. चंदन हा युक्रेनमधील विनीटसिआ मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता. चंदनला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चंदन याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारला पत्र लिहून त्यांच्या मुलाला भारतात आणण्याची विनंती केली होती. नवीन हा किराणा सामान आणण्यासाठी बंकरच्या बाहेर आला होता. त्याच काळात रशियाच्या बॉम्ब गोळ्यांनी त्याचा वेध घेतला.