राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता अभिजित हारगे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


प्रेस मीडिया लाईव्ह :

 सांगली : मिरज येथील राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता अभिजित हारगे  यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे दिलेल्या तक्रारी नुसार राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


आर्थिक देवाण घेवाणीतून संध्या आवळे यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच संध्या आवळेंना जातिवाचक शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचाही दावा केला जात आहे. या बाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता हारगे या सांगली महानगरपालिकेच्या  माजी स्थायी सभापती असून, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अभिजित हारगे यांच्या पत्नी आहेत.

मिरजेतील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे यांनी पतीच्या आजारपणामुळे आणि लॉकडाऊन मध्ये पैशाची गरज असल्याने नगरसेविका संगीता हारगे यांच्याकडून 2021 मध्ये 55 हजार रुपये उसने घेतले होते. त्या बदल्यात नगरसेविका संगीता हारगे यांनी त्या रकमेवर पाच टक्के व्याजाची आकारणी केली, त्यापैकी 39 हजार रुपये रक्कम परत केली असता थोड्या प्रमाणात मुद्दलही जमा केली असल्याचे संध्या आवळे यांनी तक्रारीत सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post