सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता व विविध प्रलंबित बिलांसाठी शासन स्तरावरून लवकर मिळावा

जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची मागणी..


सांगली : सातवा वेतन आयोगाचा दुसरा हप्ता व विविध प्रलंबित बिलांसाठी शासन स्तरावरून लवकरात लवकर निधी प्राप्त करून त्या-त्या तालुक्यांना वितरित करण्यात यावा, अशी मागणी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी सन्माननीय मोहनराव गायकवाड यांची भेट घेऊन विविध मागण्या करण्यात आल्या, यावेळी गायकवाड यांचे संघाच्या वतीने जिल्ह्यात स्वागतही करण्यात आले.


यावेळी शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड म्हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक शाळा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आगामी काळात संघटनांना विश्वासात घेऊन कृती कार्यक्रम तयार करणार आहे.यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने लेखी निवेदन देऊन प्रलंबित प्रश्नाविषयी चर्चा करण्यात आली. वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळ सत्रात भरवण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. त्यावर १६ मार्च रोजी शिक्षण समितीची बैठक असून, त्यामध्ये सकाळ सत्रातील शाळांच्या मागणीची चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.फेब्रुवारी महिन्याचा पगार तात्काळ करावेत, विषय शिक्षकांची पदोन्नती व अपंग कोट्यातून विस्तार अधिकाºयांची पदोन्नती, निवडश्रेणीचे पात्र प्रस्ताव मंजूर करावेत, डॉ.पतंगराव कदम शिष्यवृत्ती परीक्षेसाठी निरीक्षकांना स्वतालुक्यातच नेमणूक देण्यात यावी, यासह विविध मागण्या करण्यात आल्या.

यावेळी शिष्टमंडळात जिल्हा संघाचे अध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, जिल्हासंघाचे सरचिटणीस सुनील गुरव, जिल्हासंघाचे कार्याध्यक्ष सुरेश पवार, पार्लमेंटरी बोर्डाचे सरचिटणीस वसंत सावंत, दयासागर बन्ने, बाजीराव पाटील, अशोक परीट, संतोष गुरव, दिलीप पोरे, अजित जाधव, महेश कुमार माळी, दीपक रोकडे, मोहन पवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post