प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील
कोविड महामारीमुळे अनेक आव्हाने निर्माण झालेली असताना देखील लोकांचे जीव वाचवण्यात रीनल ट्रान्सप्लांट प्रोग्रॅमने संपादन केले उल्लेखनीय यश
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने २०० पेक्षा जास्त जीवन-रक्षक किडनी ट्रान्सप्लांट्स तीन वर्षात यशस्वीपणे पूर्ण करून आपल्या रीनल ट्रान्सप्लांट्स प्रोग्रॅममध्ये एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. कोविड महामारीच्या आव्हानात्मक काळात करण्यात आलेल्या किडनी ट्रान्सप्लांट्सचा देखील यामध्ये समावेश असल्याने हे यश अधिक जास्त कौतुकास्पद आहे.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट्सच्या अनुभवी टीमने २०० पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट्स केले आहेत, जे त्यांच्या उच्च क्षमता व रोबोटिक तंत्रज्ञानाचा सहयोग लाभलेल्या नेफ्रॉलॉजीमध्ये अवयव-विशेष कार्यक्षेत्रातील ज्ञान दर्शवतात. २०० पेक्षा जास्त किडनी ट्रान्सप्लांट्सचा टप्पा पार केल्याची घोषणा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईच्या रीनल ट्रान्सप्लांट टीमने काही अशी उल्लेखनीय निरीक्षणे प्रस्तुत केली ज्यामध्ये दिसून आले आहे की किडनी ट्रान्सप्लांट्समुळे लघु व दीर्घ कालावधीत मिळणाऱ्या अधिक चांगल्या परिणामांसह डायालिसिसच्या तुलनेने अधिक जीव वाचवले आहेत. टीमने ठळकपणे सांगितले की किडनी ट्रान्सप्लांट्सचा यशस्वी होण्याचा दर ९९% पेक्षा जास्त आहे आणि गुंतागुंतीची ट्रान्सप्लांट्स देखील यशस्वीपणे केली गेली आहेत, ज्यामध्ये एबीओ-इन्कॉम्पॅटिबल (मिसमॅच ब्लड ग्रुप) ट्रान्सप्लांट्स आणि रिपीट (दुसऱ्यांदा) ट्रान्सप्लांट केसेसचा देखील समावेश आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी नवी मुंबईत पत्रकार परिषद झाली.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट रोबोटिक युरॉलॉजिस्ट आणि रीनल ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. अमोलकुमार पाटील यांनी सांगितले, "अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये सर्जिकल तंत्रज्ञानाचे सतत अपग्रेडेशन केले जाते, आजच्या काळात कमीत कमी इन्व्हेसिव्ह तंत्र सर्वात जास्त वापरली जातात. यामुळे सर्जरीनंतर होणाऱ्या वेदना अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात ठेवता येतात, रुग्णाची तब्येत लवकरात लवकर बरी होते आणि शरीरावर सर्जरीच्या खुणा देखील राहत नाही, खूपच छोट्या खुणा होतात त्या लवकरच बऱ्या होतात. दा विंची सर्जिकल सिस्टिमसारख्या आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानासह अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये रुग्णांवर केले जाणारे उपचार आणि त्यांच्या परिणामांचे असे पर्याय उपलब्ध आहेत जे जगातील सर्वोत्कृष्ट पर्यायांच्या तोडीचे आहेत. सकारात्मक क्लिनिकल परिणाम आणि जागतिक स्तरावरील अनुभवांमुळे अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे भारत आणि जगभरातील रुग्णांसाठी एक लोकप्रिय पर्याय बनले आहे." भारतात वेगवेगळ्या ट्रान्सप्लांट्सचा यशस्वी होण्याचा दर ९९% पेक्षा जास्त असून अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई हे रीनल ट्रान्सप्लांट सेंटर केवळ भारतातील नव्हे तर जगभरातील रुग्णांसाठी गुणवत्ता व आशेचा मोठा किरण आहे. कोविडच्या केसेस कमी होऊ लागल्या आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरील प्रतिबंध शिथिल केले जाताच मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल पुन्हा सुरु झाले. येमेन, रवांडा, केनिया व सुदान मधील १५ परदेशी रुग्णांवर किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आल्या.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे चीफ कन्सल्टन्ट नेफ्रोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ अमित लंगोटे यांनी सांगितले, "सेंटर ऑफ एक्सेलन्स म्हणून एबीओ-इन्कॉम्पॅटिबल ट्रान्सप्लांट्समध्ये आमच्या विशेषज्ञतेने आम्हाला किडनी फेल्युअरने आजारी असलेल्या अनेक रुग्णांची मदत करण्यात सक्षम बनवले आहे, हे रुग्ण त्यांच्या मॅचिंग रक्तगटाच्या मृत किंवा जिवंत दात्याची वाट गेली अनेक वर्षे पाहत होते. आमच्या कुशल टीमने अस्वीकृतीचा धोका कमी असलेले ट्रान्सप्लांट हा एक व्यवहार्य पर्याय निर्माण केला आहे. एबीओ-इन्कॉम्पॅटिबल केसेसचे प्रमाण आजवरच्या एकूण केसेसचा ११% इतके पोहोचले आहे आणि डोनर पूल रुंदावल्यामुळे अपवर्ड ट्रेंड्स दिसून येत आहेत. आम्हाला अनेक गंभीर रुग्णांची मदत करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, त्यांची ट्रान्सप्लांट्स यशस्वी झाली आणि ते आपले सर्वसामान्य आयुष्य पुन्हा जगू लागले आहेत."
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे कन्सल्टन्ट नेफ्रोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ रवींद्र निकलजी यांनी सांगितले, "प्रत्यारोपणानंतर एकूण आरोग्य आणि जीवनाची आरोग्यासंबंधी गुणवत्ता यामध्ये सुधारित तंत्रज्ञान आणि अधिक चांगल्या इम्युनोसप्रेशनमुळे सुधारणा झाली आहे. दुसऱ्यांदा किंवा रिपीट ट्रान्सप्लांटेशनसाठी येणाऱ्या कित्येक रुग्णांना डायालिसिसच्या तुलनेने अधिक चांगले लाभ प्रदान करत मदत करण्यात याने आम्हाला सक्षम बनवले आहे. ही सर्जरी आव्हानात्मक आहे पण आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही रिपीट ट्रान्सप्लांट्स अतिशय प्रभावीपणे करू शकलो आहोत. एक निरोगी वयस्क व्यक्ती देखील तब्येतीवर कोणताही गंभीर परिणाम न होता दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी दाता बनू शकते ही जागरूकता निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत."
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे जॉईंट मेडिकल डायरेक्टर डॉ रवी शंकर यांनी सांगितले, "एकदा का गंभीर किडनी आजार तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचला की फक्त किडनी ट्रान्सप्लांट हाच उपाय आहे जो डायालिसिसपेक्षा अधिक दर्जेदार जीवनासह एक स्थिर तोडगा देऊ शकतो. ट्रान्सप्लांटसाठी उपलब्ध किडन्या कमी असल्यामुळे रुग्ण डायालिसिससाठी जातात. आम्हाला आनंद आहे की किडनी ट्रान्सप्लांटमध्ये आमच्या सेंटर ऑफ एक्सेलन्समध्ये किडनी ट्रान्सप्लांटची वाढती मागणी यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक विशेषज्ञता व अनुभव आहे कारण किडनी फेल्युअरच्या रुग्णांना चांगले आरोग्य प्रदान करण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगले व दीर्घ आयुष्य देण्यासाठी हा एकमेव पर्याय उरलेला आहे."
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे रिजनल सीईओ वेस्टर्न रिजन श्री. संतोष मराठे यांनी सांगितले, "भारतात पहिली ऑर्गन ट्रान्सप्लांट रजिस्ट्री विकसित करण्यापासून भारतातील काही महत्त्वाच्या किडनी ट्रान्सप्लांट सर्जरी करण्यापर्यंत, अपोलो हॉस्पिटल्स ग्रुप अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामार्फत सक्षम ट्रान्सप्लांट सर्जरीसह दर्जेदार परिणाम प्रदान करण्यात नेहमी आघाडीवर आहे. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईमध्ये किडनी ट्रान्सप्लांट टीमचे नेतृत्व देशातील काही सर्वोत्तम व अनुभवी ट्रान्सप्लांट सर्जन्स करत आहेत. टीमला विविध क्षेत्रातील विशेषज्ञांचे सहकार्य मिळते, ज्यामध्ये नेफ्रोलॉजिस्ट्स, युरॉलॉजिस्ट, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर, सामाजिक कार्यकर्ते, मनोवैज्ञानिक आणि एनेस्थिसियोलॉजिस्ट यांचा समावेश आहे, ही टीम जगभरातील सर्वोत्कृष्ट परिणामांच्या तोडीचे परिणाम प्रदान करते. आम्हाला आमच्या सेवांच्या पोर्टफोलिओमध्ये किडनी ट्रान्सप्लांट सेंटरमार्फत प्रदान केल्या जाणाऱ्या विशिष्ट सेवांचा अभिमान वाटतो.