माणगाव येथील मेडीकल दुकानदारावर गोळीबार करणारे आरोपी गजाआड

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची उत्तम कामगिरी.



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड अलिबाग यांनी माणगाव येथील मेडीकल दुकानदारावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना  जेरबंद केले.

माणगाव पोलीस ठाणे कॉ.गुन्हा रजि. नंबर 28/2022, भा.द.वि. कलम 307,34 शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25 वगैरे प्रमाणे माणगाव पोलीस ठाणे येथे दिनांक 12/02/2022 रोजी 04.53 रोजी गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयात अज्ञात आरोपीत यांचे विरूध्द फिर्यादी दिपक रामकिशोर यादव, वय-24, रा. सुखादेवी बिल्डींग कचेरी रोड माणगाव, ता. माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाणे येथे फिर्यादी काम करीत असलेल्या मेडीकल मालक शुभम ग्यानचंद्र जैसवाल, वय-24, रा. माणगाव, ता. माणगाव यांचे सोबत रात्रोचे वेळी मेडीकल बंद करून घरी परत येत असतांना एका काळे रंगाचे पल्सर मोटार सायकल वरील अज्ञात दोन मोटार सायकल स्वार यांनी पत्ता विचारण्याचा बहाना करून सोबत असलेल्या शुभम ग्यानचंद्र जैसवाल यास मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमांने त्याचे जवळील पिस्तुल शुभम ग्यानचंद्र जैसवाल याचे उजवे बाजुस पोटावर त्याला ठार मारण्याचे उद्देशाने गोळीबार करून मुंबई-गोवा महामार्गाने इंदापुर बाजुकडे पळुन गेले म्हणुन तक्रार दिली होती. गुन्हयाचे गांभीर्य पाहता मा.पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार वरील गुन्हयाचा समांतर तपास श्री. दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.अ. शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक/डोंबाळे, पोलीस उप निरीक्षक शाखेकडील कर्मचारी यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते. महेश कदम व स्थानिक गुन्हे अन्वेशण

सदर दाखल गुन्हयातील अज्ञात मोटार सायकल स्वार यांचा शोध घेतला असता सदर आरोपीत यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटार सायकल ही मौजे कळमजे गावचे रोडलगत नदी किनारी बेवारस स्थितीत मिळून आली. बेवारस मिळून आलेल्या मोटासायकलचे मालकाचा शोध घेतला असता सदर मोटार सायकल ही वाशी पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झाली असुन वाशी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 40/2022, भादवि.क.379 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनात आले. सदर ठिकाणी मिळालेल्या फुटेजचे आधारे समांतर तपास करीत असताना दाखल गुन्हयातील जखमी यांचे वडील नामे ग्यानचंद जिउतबंधन जैसवाल यांस त्याचे फोनवर कोणत्यारी अज्ञात नंबर वरून, 2 दिवसात दोन करोड रूपये दे नाहीतर तुझ्या परीवारांस मुला प्रमाणे जिवेठार मारू असा धमकीचा कॉल आला. सदर बाबत माणगाव पोलीस ठाणे येथे माणगाव पो. ठाणे 44/2021 भादवि.क. 385, 507 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

वरील दाखल गुन्हयातील आरोपीत यांचे आलेल्या धमकीचे कॉलचा तांत्रिक विश्लेषण करून

आरोपीत यांचा शोध घेतला असता सदर गुन्हा हा खालील नमुद आरोपीत यांनी मिळुन केल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीत यांस ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गोळीबार करणेकरीता आरोपीत यांनी वापरलेला गावठी कटटा तसेच एक जिवंत राउंड आरोपीत यांचे कडुन हस्तगत करण्यात आलेला आहे.

अटक आरोपीत नाव / पत्ता:- 1. मयुर सुरेश गवळी, वय-21, रा. नंदुचाळ, रूम नं. 1174, डायघर रोड, शिळफाटा, मुंब्रा, ठाणे. 2. अजय महादेव अवचार, वय 20, रा. शंकरवाडी चाळ, रूम नं. 108 नौसिल नाका, रबाळे, नवी मुंबई, 3. राजेष विजय शेळके, वय 22, रा. शंकरवाडी चाळ रूम नं. 717, नौसिल नाका, रबाळे, नवी मुंबई, 4. नितीन शिरमाजी कांबळे, वय, 24, रा. शंकरवाडी चाळ रूम नं. 717, नौसिल नाका, रबाळे, नवी मुंबई.

गोळीबाराचे कारण :- आरोपीत मयुर सुरेश गवळी याचे पिडीत याचे बहीणीशी असलेल्या प्रेम संबधात पिडीत अडथळा ..

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनानुसार श्री. दयानंद गावडे, स्था.गु.अ. शाखा, रायगड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उप निरीक्षक / संजय डोंबाळे, पोलीस उप निरीक्षक / महेश कदम, सहा. फौज/गिरी, पोहवा/दिपक मोरे, पोहवा/सुधीर मोरे, पोहवा/अमोल हंबीर, पोहवा/प्रतीक सावंत, पोहवा/जितेंद्र चव्हाण, पोना/ईश्वर लांबोटे, पोकॉ/अक्षय सावंत, चा.पोह/देवराम कोरम व सायबर सेल शाखेचे पोना/अक्षय पाटील, पोना/तुषार घरत या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली असुन वरील गुन्हयाचा पुढील तपास श्री. राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक माणगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post