प्रेस मीडिया लाईव्ह
रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील :
रायगड जिल्हा परिषदेच्या कोल्हारे येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान सप्ताह साजरा केला. २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत कोल्हारे शाळेमध्ये विज्ञान सप्ताह मध्ये साजरा करताना विद्यार्थ्यांच्या विविध प्रतिकृती यांनी सर्वांची वाहवा केली.
कोल्हारे येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान सप्ताहाचा समारोप कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख शिवाजी धराडे यांच्या उपस्थितीत झाला.त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास हजारे,कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य सविता कोळंबे यांची उपस्थिती होती.शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर जुईकर तसेच उपशिक्षिका जयंती कोल्हे,रंजना शिंदे,विठ्ठल वाडकर यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोगाच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.राष्ट्रीय विज्ञान सप्ताहात सहा दिवस शाळेत विज्ञान संबंधित वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले. शेवटी सप्ताहात प्रेम सुनील खेडकर याने पाण्याचे आकारमान हि प्रतिकृती तर दृष्टी विनायक हजारे याचे विविध वनस्पतीचे वर्गीकरण करणे तसेच सार्थक दत्ता गेमारे याच्या अन्नातील मेस शोधणे तसेच मेघना मंगेश जामघरे हिच्या पदार्थीचे गुणधर्म सांगणे हि प्रतिकृती तसेच नैतिक एकनाथ गोमारे याने न्यूटन की तबकडी तर नुपूर दशरथ पाटील गढून पाणी शुद्ध करणे तर लक्ष्मण रायमोळे याने पाणी शुद्ध करणे दिन व रात्र कसे होतात आणि नेहाल फुलावरे आणि तनुष्का पडवळ यांनी पिपतमय पदार्थाची ओळख हि प्रतिकृती मांडली होती.दिगंबर खेडेकर या विद्यार्थ्याने प्रकाशाचे संक्रमण तर दिव्येश हजारे याने पाण्याची घनता वाढली असता बटाटा त्यावर तरंगतो हि प्रतिकृती मांडली होती आणि श्रवण गोमारे याने करंजाची निर्मिती तर प्रेम भंडेरे हवेची ज्वलनास मदत हा प्रयोग मांडला होता.तालुक्यातील अनेक शाळांमध्ये राष्ट्रीय विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला आहे.