पत्रकारांवर हल्ला केल्यास ३ वर्षे कैद.



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :  सुनील पाटील

मुंबई :- पत्रकारांवर वाढते हल्ले लक्षात घेऊन पत्रकार आणि प्रसार माध्यम संस्थांना संरक्षण देणारे विधेयक अखेर महाराष्ट्र विधानसभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आले आहे..


यानुसार आता पत्रकार माध्यमनंतर हल्ला करणाऱ्यांस तीन वर्षांचा किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्हीही,अशी शिक्षा होणार आहे तसेच पत्रकारांवरील हल्ला दखल पात्र व अजामीनपात्र असणार आहे..

महाराष्ट्र प्रसार माध्यम संस्था आणि ( हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम,२०१७ या नावाने हा कायदा अस्तित्वात येणार आहे. विधानसभेत चर्चेविना हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post