प्रेस मीडिया लाईव्ह ने केले त्यांच्या उपक्रमाचे कौतुक.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : सेवा मित्र मंडळाच्या वतीने होळी निमित्त दरवर्षी एक पोळी उपेक्षितांसाठी या उपक्रमाचे आयोजन मडळाचे अध्यक्ष शिरीष भाऊ मोहिते व सहकारी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शुक्रवार पेठ सेवा मित्र मंडळ चौक येथे करण्यात येतो या वर्षी 200 पेक्षा जास्त पुरणपोळी संकलित जमा झालेल्या पुरणपोळी व मसाले भात एकलव्य न्यास मऺगळवार पेठ पुणे व लुई ब्रेल अंध अपंग कल्याणकारी संस्था वाघोली या दोन संस्थांमधील अपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांसाठी देण्यात आली.
या वेळी अर्जुन सर ( लुई ब्रेल संस्थेचे प्रतिनिधी ) , उमेश कांबळे , अमर लांडे , कुणाल जाधव आणि सेवा मित्र मंडळ चे तरुण तडफदार कार्यकर्ते विक्रांत शिरीष मोहिते व सहकारी प्रामुख्याने भाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमाबाबत सर्वत्र चर्चा असून सर्वांकडून त्यांचे कौतुक होत आहे. प्रेस मीडिया लाईव्हने त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.