त्या आधी विकास कामांची उद्घाटने, भूमिपूजनाचा धूमधडाका सुरू आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अनवरअली शेख :
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे,कार्यकाळ संपण्यास अवधे दहा दिवस शिल्लक उरले असल्याने सत्ताधारी भाजपने रोज विविध विकास कामाची उद्घाटने, भूमिपूज करण्याचा धूमधडाका लावल्याचे चित्र दिसून येत आहे.
महापालिकेच्या वतीने दापोडी येथे आ. क्र. 3/31 मध्ये 2 हेक्टर जागेमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध उद्यान उभारण्यात आले असून या उद्यानात लॉन, पाथवे, कंपाउंड वॉल, आकर्षक प्रवेशद्वार, लहान मुलांसाठी खेळणी तसेच स्केटिंग रिंग तयार करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 30 दापोडी येथे उभारण्यात आलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध उद्यान आणि इतर विकासकामांचा लोकार्पण समारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते बुधवारी पार पडला. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणामुळे महापालिका निवडणूक वेळेत झाली नाही. निवडणूक लांबणीवर गेली आहे. 13 मार्चनंतर महापालिकेवर प्रशासक येणार आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवट येण्यापूर्वी उद्घाटने, भूमिपूजनाचा धडाका लावला आहे. 13 मार्चनंतर प्रशासन आणि राज्य सरकारच्या प्रतिनिधी उद्घाटने, भूमिपूजन करतील. त्या अगोदरच उद्घाटने, भूमिपूजन करून भाजपकडून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे