आता सर्वांचे लक्ष निवडणुका कधी लागणार या कडे...
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उप संपादक )
पुणे: महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर महानगरपालिका पदाधिकारी त्यांची वाहने जमा करतात. मात्र पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यामुळे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपले शासकीय वाहन जमा केले.
ते आपल्या स्वतःच्या कार मध्ये आज घरी गेले. पुणे महानगरपालिका सभागृहाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे आजपासून महानगरपालिकेचा कारभार प्रशासक पाहणार आहे. आयुक्त विक्रम कुमार पाटील प्रशासक म्हणून आता पालिकेचे प्रमुख असणार आहेत. महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ 13 तारखेला संपुष्टात आला असून आता प्रत्येकजण निवडणूक कधी लागणार या कडे लागले आहे.