हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्यासह 20 जणांवर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल




प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे शहर प्रतिनिधी : जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, पतीत पावन संघटनेचे स्वप्नील नाईक यांच्यासह 20 जणांवर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. अद्याप मिलिंद एकबोटे यांना अटक केलेली नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 

या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात जमाव जमवणे आणि दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मिलिंद एकबोटे, स्वप्नील नाईक यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत सरकारतर्फे तक्रार देण्यात आली आहे. यात 20 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यात पोलिसांनी 15 जणांना अटक केली आहे. शहरात मंगळवारी महाशिवरात्री उत्साहात पार पडली. अनेक भागात कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान कसबा पेठेतल्या पवळे चौकात देखील पूजेचा कार्यक्रम देखील पार पडला. पुण्यश्वर बचाव समितीने व इतर संघटनेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. याला मिलिंद एकबोटे, स्वप्नील नाईक व इतर उपस्थित होते. पंरतु या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांकडून घेतली नव्हती. बेकायदेशीर जमाव जमवून तसेच दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post