प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजा समोर येत गेल्या.
जगात एक वेळ अशी होती महिलांना दुय्यम स्थान दिलं जात होतं. जुण्या काळात भारता मध्ये महिलांना सती जावं लागत होतं, सती प्रथेच्या नावाखाली लाखो महिलांना आपलं जीव गमवावा लागला. महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. अरब देशांमध्ये इस्लाम धर्म येण्या आधी मुलगी जन्माला आली तर तिला जिवंत पुरल ( दफन ) केलं जात होतं. स्त्रियांचे हक्क व अधिकारासाठी ठाम उभे राहणारे मोहम्मद पैगंबर, त्या काळात आज पासून चौदाशे वर्ष पूर्वी इस्लाम च्या अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी समस्त मानव जातीला संदेश दिला आईच्या पायाखाली स्वर्ग आहे, अर्थातच स्त्रीच्या पायाखाली स्वर्ग आहे. चौदाशे वर्षा पूर्वी महिलांचे हक्क व अधिकार जगाला दाखवून देणारे अंतिम प्रेषित मोहम्मद पैगंबर साहिब होय.
इस्लामच्या अनुयायांना मोहम्मद प्रेषित साहेब यांनी महिलांचे काही अधिकार समजावून सांगितले, त्या पैकी....
१) स्त्री आणि पुरुष धार्मिक दृष्ट्या समान आहे.
२) मूलभूत अधिकार स्त्री आणि पुरुष यांचे समान आहे.
३) शैक्षणिक अधिकार स्त्री आणि पुरुष यांचे समान आहे.
४) स्त्रियांचे सामाजिक अधिकार.
५)स्त्रियांचे कायदा ,व्यवस्था, व्यवहार ,आधिकर .
६) स्त्रियांचे कौटुंबिक अधिकार .
७ ) स्त्रियांचे राजनीतिक अधिकार.
पैगंबर साहेबांनी शिकवण दिली की तुमच्यापैकी सर्वश्रेष्ठ पुरुष तो आहे जो स्वतःच्या पत्नीबरोबर चांगला व्यवहार करील, त्याचबरोबर विधवा महिला ही अशुभ नसते, तिलाही पुनर्विवाह करण्याचा अधिकार आहे. तिलाही पुनर जीवन सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. पैगंबर साहेबांनी आपल्या अनुयायांना शिकवण दिली की पराई स्त्रीला महिलेला दृष्ट ( घाणेरड्या ) नजरेने पाहणे पाप आहे.
धर्मांध लोकांना पैगंबर साहेबांच्या शिकवणीचा विसर पडला आणि स्त्री जातीवर अत्याचाराचे प्रमाण वाढले त्यामुळे महिलांना आपल्या हक्क व अधिकारासाठी उभं राहावं लागलं , संघर्ष करावा लागला, त्यातूनच महिला दिवसाची निर्मिती झाली
दिनांक २८ फेब्रुवारी १९०९रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.