उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पीए सोबत ओळख असल्याचं, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्‍या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक

बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये दोघा विरोधात गुन्हा दाखल ,  आरोपी प्रवीण जगताप यास अटक 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे शहर प्रतिनिधी : जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पीए सोबत माझी ओळख असल्याचं, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्‍या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना  नुकतीच घडली आहे.या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण विठ्ठल जगताप (रा. वाई, सातारा) आणि एक अनोळखी व्यक्ती अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रवीण विठ्ठल जगताप यास अटक करण्यात आली.

 या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पुणे महानगरपालिके मार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो. माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी चांगली ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे आरोपी प्रवीण विठ्ठल जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन यांनी सांगितले.त्या वर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर पटवर्धन यांनी आरोपीला १० लाख रुपये दिले, पण तो काही काम करीत नाही व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी आमच्या कडे तक्रार दिली. तक्रारीनंतर आरोपी प्रवीण जगताप यास अटक केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post