प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : डॉ. तुषार निकाळजे यांचे "भारतीय निवडणूक प्रणाली "हे पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता मिळाली आहे.
तसेच आबेदा इनामदार कला व वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त),पुणे यांच्या अभ्यासक्रमास देखील सदर संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता मिळालीआहे .यापूर्वी डॉ. निकाळजे यांचे हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ ,जळगाव विद्यापीठ यांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता मिळाली आहे. डॉ.तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षकेत्तर- कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत .वरील पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये वर्ष २०१९ मध्ये झाली आहे.
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ,पुणे या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या "इंडियन कॉन्स्टिट्यूशन" या विषयास डॉ. निकाळजे यांच्या Indian Election System (changes and challenges) या इंग्रजी पुस्तकाची अभ्यासक्रमास संदर्भ पुस्तक म्हणून निवड झाली आहे.
Tags
पुणे