पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा पार पडणार



प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे शहर प्रतिनिधी : जीलानी ऊर्फ मुन्ना शेख :

पुणे  : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर  मेट्रोची सेवा  आज सुरू होणार . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.पण त्याआधीच पुणे मेट्रोचे दर किती असणार आहे, हे जाहीर करण्यात आले आहे. कमीत कमी मेट्रो प्रवासासाठी पुणेकरांना 10 रुपये मोजावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी पुणे दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचंही उद्घाटन होणार आहे.

तसंच या दौऱ्यात पंतप्रधान जंगी सभाही घेणार आहेत. म्हणूनच मोदींच्या पुणे दौऱ्याची युद्धपातळीवर जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे, महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मेट्रोचे दरपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.6 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपासून वनाज स्थानक ते गरवारे मेट्रो सुरू होणार आहे. तसंच पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी स्थानक मेट्रोसेवा सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो ही सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पिंपरी चिंचवड पालिका ते फुगेवाडीसाठी 20 रुपये मोजावे लागणार आहे. तर गरवारे कॉलेज ते वनाजपर्यंत 20 रुपये तिकीट आकारले जाणार आहे. तर एक किंवा दोन स्थानकापर्यंत प्रवासासाठी 10 रुपये आकारले जाणार आहे. दोन्ही सेक्शनसाठी दुहेरी प्रवासासाठी 30 रुपये तिकीट दर असणार आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी हे मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर जातील. तेथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहे.  मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जंगी सभा होणार आहे. या सभेसाठी एमआयटी ग्राऊंडवर भव्य मंडप उभारला जाणार आहे.

मोदींचं मिशन पुणे..

1. मोदी आज सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत पुण्यात

2. सकाळी 10.30 वाजता पुणे विमानतळावर आगमन

3. सकाळी 11 वाजता पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण

4. सकाळी 11.30 वाजता पुणे मेट्रोचं उद्घाटन, गरवारे स्टेशन (पंतप्रधान मेट्रोने प्रवास करणार)

5. 12 वाजता एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन, त्यानंतर जाहीर सभा

6. 1.45 वाजता, सिम्बाय़सिस, आर के लक्ष्मण गॅलरीचं उद्घाटन

7. 3 वाजता पुण्याहून रवाना होणार

  आंदोलन करणार.....राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ..


तर दुसरीकडे, काही ही झालं तरी मोदींच्या समोर आंदोलन करणार अशी भूमिका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. मेट्रोच काम पूर्ण झालेलं नसताना ही केवळ 5 किमीच्या अंतरातील काम गडबडीत पूर्ण करून निवडणुकुचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन उद्घाटन केलं जात असल्याचा आरोप जगताप यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानिमित्त शहरात कडक पोलिस बंदोबस्त ..












Post a Comment

Previous Post Next Post