वीस हजार रुपये लाच घेणाऱ्या तलाठी महिला तलाठीस पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :( उपसंपादक :)

पुणे: जमिनीच्या ७/१२ नोंदीसाठी महिला तलाठी आणि सहकारी खाजगी व्यक्तीने ३० हजार रुपयांची मागणी केली होती शेवटी वीस  हजार  मध्ये तडजोड केली , वीस हजार रुपये लाच घेणाऱ्या तलाठी महिला तलाठीस  पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

चाकण मधील आंबेठाण येथील तलाठी कार्यालयात. पुणे 'एसीबी'च्या विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. वर्षा मधूकर धामणे (वय ४५, रा. तलाठी, सजा म्हाळूंगे, अतिरिक्त कार्यभार आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेल्या तलाठ्याचे नाव आहे.तक्रारदार यांनी पाच वर्षापुर्वी महाळुंगे गावच्या हद्दीत जमीन खरेदी केली. खरेदी केलेल्या जमिनीच्या सात-बारा नोंदीसाठी तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारत होते. पण  तलाठी कार्यालयातून नोंदीचे काम होत नव्हते. तलाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारल्यानंतर खासगी व्यक्ती अकबर यांच्याकडून सात-बारा नोंदीसाठी सुरवातीला एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानंतर महिला तलाठी वर्षा धामणे यांनी तडजोडीत ठरलेली 20 हजार रुपये स्वीकारली. त्यावेळी 'एसीबी'च्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post