जाती धर्माचे अंतिम संस्कार स्वतःची पदरमोड करून अंजुम इनामदार व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी केलेली. पुण्यातील ऐतिहासिक घटना .
डॉ. पी.ए. इनामदार....
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मानवतेचे काम करत माणुसकीच्या मार्गाने जाण्याचा संकल्प आज तरुणांनी करणे खूप गरजेचा आहे. कोरोनाची लस सापडली असली तरी हिंदू-मुसलमाना धार्मिक तेढ या प्रश्नांवरची लस शोधण्याचे काम सध्या स्थितीत करावे लागेल.व्यवस्थेला जो ताप आला आहे त्या तापावर उपचार करण्याची गरज आहे. कोरोना जातोय पण माणसाच्या मनाला मेंदूला जो कोरोना झाला आहे त्याचे काय?
असा थेट सवाल ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी आजच्या स्थितीवर करताना विचारला. कोरोना मृत्यूनंतर... नाते मानवतेचे या अंजुम इनामदार लिखित पुस्तकाचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उद्योजक हाजी नजीर तांबोळी, तसेच डॉ. पी.ए. इनामदार शिक्षण महर्षी, माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, गणराज्य संघाचे अध्यक्ष सुषमाताई अंधारे, ज्येष्ठ विचारवंत रफीक सय्यद, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. आझम कॅम्पस या ठिकाणी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी आझम कॅम्पस पुणे येथे बोलत असताना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव म्हणाले की संविधानाला अनुसरून काम करणाऱ्यासाठी सजग तरुणांनी पुढे यावे नेतृत्व करावे आणि जागे राहून समाजकारण, अर्थकारण, समजून घ्यावे जाती-धर्माच्या चौकटी तोडून माणूस जोडण्याची व्यापक चळवळ निर्माण केली पाहिजे.
डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले भारता सह जग चिंताग्रस्त असताना कोरोनाच्या अतिशय कठीण काळात मानवतेचे नाते जोपासत कोरोना मुळे मृत्यू झालेल्या सर्व जाती धर्माचे अंतिम संस्कार स्वतःची पदरमोड करून अंजुम इनामदार व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी केली. हे ऐतिहासिक घटना पुण्यात घडते ही मोठी मानवतावादी घटना आहे. जिवंतपणीच इतिहास निर्माण करावा अशी ही बाब आहे. खासदार शरद पवार यांनी या मानवतेच्या कार्याचे नेमकेपणाने कौतुक केले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी नजीर तांबोळी म्हणाले की माणुसकी जिवंत आहे आमच्यातला माणूस मरत नाही तो जिवंत असला पाहिजे मानवता करिता जीवाची बाजी लावण्याचे साहस आपल्यात आहे. हे अंजुम इनामदार व त्यांच्या हकार्यांनी दाखवून दिली या त्यांच्या अभूतपूर्व कार्याची दखल समाज नक्कीच घेईल व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.
सदर प्रसंगी लक्ष्मी आव्हाड यांनी कोरोना काळातील अनुभवांचे कथन केले. माझ्या आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या सर्व सदस्यांनी मला जे मदत केली ते मी आयुष्यात कधीच विसरणार नाही घटना सांगत असताना उपस्थितांची डोळे पाणावले. सुषमा अंधारे, एस. एम. मुश्रीफ, मेघराज राजभोसले, रफिक सय्यद इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रस्ताविक पुस्तकाचे लेखक अंजुम इनामदार यांनी तर सूत्रसंचालन दिपक म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते हजी नदाफ यांनी केले.
पुस्तक लोकार्पण सोड्याच्या या कार्यक्रमास पुणेकर नागरिकांसह विदर्भ मराठवाडा मुंबई येथील नागरिकांनीही विशेष उपस्थिती लावली होती.