फोन टॅपिंग चा उपयोग सरकार पाडण्यासाठी : एड सतीश उके .
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : तत्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सरकारच्या इशाऱ्यावरून माझ्यासह अनेकांचे फोन टॅपिंग केले होते. यामागे न्या .लोया , अँड. श्रीकांत खंडाळकर व निवृत्त न्यायाधिश ठोंबरे मृत्यूप्रकरणाची रहस्ये दडलेली आहेत ,त्यासाठी इस्त्रायली स्पायवेअर वापरण्यात आले. त्याचाच वापर राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करून सरकार पाडण्यासाठी होत आहे ,असा आरोप एड .सतीश उके (नागपूर )यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे केला.पुण्यात पत्रक प्रसिद्धीस दिल्यावर उके यांनी मुंबईत देखील आज पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचा पुनरुच्चार केला . अँड. सतीश उके , अँड. रवी जाधव आणि अँड. समीर शेख यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती .
फोन टॅपिंग करून रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर कृत्य केले आहे. त्यांच्यासह त्यांना आदेश देणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्यात उके यांनी केली.
अॅड. उके म्हणाले की, इजराईली पेगासिस स्पायवेअरच्या माध्यमातून माझ्या मोबाईलमधील डेटा चोरण्यात आला आहे. याचप्रमाणे लोया न्या. मृत्यूप्रकरणातसुद्धा इस्रायली स्पायवेयरद्वारे महत्वाची माहिती इतरांच्या मोबाईलमधून चोरून त्यातील पुरावे मिटविण्यात आले. त्यात अँड. श्रीकांत खंडाळकर व निवृत्त न्यायाधिश ठोंबरे मृत्यूप्रकरण घडविण्यात आले. अँड. श्रीकांतमधील खून प्रकरणात त्यांचा मोबाईल आजपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. अँड. सतीश उके यांचे मोबाईल मध्ये सेव्ह असलेला त्यांचा दुसरा खाजगी मोबाईल क्रमांकदेखील इस्रायली पेगासिस वापरून चोरण्यात आला. याप्रकरणी अजनी पोलिसांना अति. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दि. ३० डिसेंबर २०२० रोजीचे आदेशाने तपास करण्याची परवानगी दिली आहे. त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही अँड. सतीश उके यांनी केली आहे.
सतीश उके म्हणाले ,'राजकीय मंडळींचे व त्यांचे C.A. / P.A. यांचे मोबाईल व इतर संगणकीय प्रणाली यातून चोरी करून त्या आधारे इतर माहिती गोळा करून देवेंद्र फडणवीस यांची टीम यांनी ती माहिती ई. डी. व अन्य राष्ट्रीय तपास संस्था यांचे कडे महाराष्ट्रातील सरकार पाडणे व इतर राजकीय पक्ष रिकामे करण्याचे करीता देत आहे . या सोबतच अश्या या कामात गुंतलेले फडणवीस यांचे अनेक लोक या करीता महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळीच्या कागदपत्रांची आणि गोपनीय आणि खाजगी माहितीची चोरी करणे त्याकरीता या नेते मंडळी यांचेशी सलगी साधून माहिती मिळविणारे आणि धोकाधडी करणारे व्यक्ती हे किरीट सोमय्या यांचे समूहात शामिल आहेत . अश्या प्रमाणे चोरीने प्राप्त केलेली माहिती यांनी ज्या ई.डी. व राष्ट्रीय तपास यंत्रणा यांचे अधिकारी यांना दिली आणि ज्या अधिकारी यांनी उपयोग केला ते सुद्धा त्यात शामिल झाले आहेत'.