कात्रज येथील गॅस सिलिंडर स्फोट प्रकरणी गोडाऊन मालक आणि जागा मालकासह चार जणांवर गुन्हे दाखल



प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख : (उपसंपादक )

पुणे : कात्रज येथील अंजली नगर परिसरात मंगळवारी एका अनधिकृत गॅस गोडाऊनला  लागलेल्या भीषण आगीत  20 ते 25 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले होते.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी या प्रकरणी गोडाऊन मालक आणि जागा मालकासह चार जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.


गोडाऊन मालक सागर संदीप पाटील, जागा मालक दत्तात्रय काळे, सोनू मांगडे आणि संपत सावंत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सागर संदीप पाटील याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई गणेश खंडू काळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून अवैधरित्या विना परवाना एलपीजी गॅस सिलिंडरचा साठा केला होता. या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मधून लहान टाक्यात गॅस रिफिलिंग केला जात होता. मंगळवारी या ठिकाणी आग लागली. यामध्ये 20 ते 25 गॅस सिलिंडरचे स्फोट झाले. यामध्ये स्थानिक नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. या आगीमध्ये फुटलेल्या अनेक गॅस सिलेंडरच्या टाक्या आजूबाजूचा घरावर पडून घराच्या काचा फुटल्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक पुराणिक अधिक तपास करत आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post