प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख
पिंपरी, चिंचवड दि ८. चिंचवड येथे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत ‘फडणवीस गो बॅक’ अशा घोषणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.माजी आमदार, माथाडी नेते कै. अण्णासाहेब पाटील स्मारकाचे उदघाटन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस चिंचवड येथे आले होते.
ही घटना रविवारी दि.६ सायंकाळी दसरा चौक, चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या वतीने केएसबी चौकातील अण्णासाहेब पाटील पुतळा स्थलांतरित करण्यात आला असून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. त्या कामाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. फडणवीस हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आले त्यावेळी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत.
हातातील काळे झेंडे दाखवून ‘फडणवीस गो बॅक, भाजपा सरकार हाय हाय, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करून निदर्शने केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली