हत्येप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली.
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
एका 16 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण करुन त्याची हत्या केल्याची धक्कादाक घटना पुण्यातील कोथरुड मध्ये गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे.या अत्याचार आणि हत्येप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा तरुण आणि पीडित मुलगा हे दोघेही शेजारी आहेत. हत्येनंतर तरुणाने मुलाचा मृतदेह पोत्यात भरुन फेकून दिला. कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पीडित अल्पवयीन मुलाला बोलण्याची समस्या होती. आरोपी हा पीडित तरुणाचा शेजारी आहे. आरोपीने आधी मुलाचे लैंगिक शोषण केले आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. आरोपीविरोधात आयपीसी 302, 201, 364 आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.
एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील शिवाजी नगर परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत आरोपी वॉचमनला अटक केली आहे. मंग्या (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित मुलगी शाळेत आल्यानंतर त्याने पीडित मुलीला बोलण्यात फसवत बाथरुमकडे नेले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिला बाथरुमच्या आत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
मुलीने सदर घडलेला सर्व प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. त्यानंतर शाळेतील शिक्षकांना याची माहिती दिली. शिक्षकांनी मुलीच्या पालकांना आणि पोलिसांना याबाबत कळवले. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.